मुंबईत कॉलेजचं नाव गुजरातीत! हा महाराष्ट्र आहे की गुजरात?
कांदिवलीतील बालभारती मगनलाल जे पंचोलिया कॉलेजच्या प्रवेशद्वारावरील गुजराती भाषेतील नामफलकामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाच्या युवासेनेने याला मराठी भाषेवरील अतिक्रमण संबोधत तीव्र आक्षेप घेतला आहे. संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप असून, यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कांदिवलीतील बालभारती मगनलाल जे पंचोलिया कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नामफलकावर गुजराती भाषेत नाव असल्याने एक नवीन वाद निर्माण झाला आहे. ही घटना “हा महाराष्ट्र आहे की गुजरात?” असा प्रश्न उपस्थित करत आहे. ठाकरे गटाच्या युवासेनेने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून, याला मराठी भाषेवरचे अतिक्रमण आणि अन्याय म्हटले आहे.
युवासेनेने प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मराठी नावाऐवजी गुजराती नाव लावणे चुकीचे आहे आणि शासनाने यावर ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. नामफलकावर मराठीचा म देखील नसून, गुजराती आणि इंग्रजीमध्येच नाव लिहिलेले आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही संस्थेचे फलक मराठीमध्येच असावेत असा नियम असतानाही, हे कॉलेज नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी पालघरमध्येही गुजराती भाषेतून सूचना फलक लावल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे सरकारने यावर त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published on: Feb 27, 2026 09:58 AM
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेस
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग...
मोठी खळबळ!दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
