Stock Market Crash: शेअर बाजाराला पुन्हा हादरा, सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही आपटले, 300 अंकांहून जास्त घसरण
Stock Market Crash: आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात शुक्रवारी 27 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना हादरा दिला. 27 फेब्रुवारी रोजी बाजाराची सुरुवात पडझडीने झाली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 लाल रंगात न्हाऊन निघाले. निर्देशांक 300 अंकांहून जास्त घसरला.

Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या सत्रात शुक्रवारी 27 फेब्रुवारी रोजी गुंतवणूकदारांना पुन्हा झटका बसला. बाजारात सुरुवातीला पडझड झाली. मुख्य निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 लाल रंगात न्हाऊन निघाले. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 28.13 अंक वा 0.03 टक्क्यांनी घसरला. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्सने 82,220.48 टप्पा गाठला. तर एनएसई निफ्टी 50 मोठी घसरण दिसली. निफ्टी 50, 36.70 अंक वा 0.14 टक्क्यांनी घसरून 25,459.85 च्या स्तरावर उघडला. सकाळी जवळपास 9:24 वाजेपर्यंत, सेन्सेक्स 253 अंकांच्या घसरणीसह 81,994 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी 50, 83 अंकांनी घसरून 25,412 स्तरावर व्यापार करत होता.
बीएसई टॉप गेनर आणि लूजर
या सत्रात टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एटरनल, टीसीएस आणि ट्रेंट आघाडीवर होते. तर मारुती, इंडिगो, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एयरटेल आणि रिलायन्समध्ये घसरण दिसून आली.
गुरुवारी बाजाराची स्थिती काय?
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी, 26 फेब्रुवारी व्यापार संथावला. प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स लाल रंगात न्हाऊन निघाला. तर एनएसई निफ्टी 50 सुधारला. सेन्सेक्स 27.46 अंक वा 0.03 टक्क्यांच्या घसरणीसह 82,248.61 अंकावर तर एनएसई निफ्टी 50, 14.05 अंक वा 0.06 टक्क्यांनी उसळून 25,496.55 स्तरावर बंद झाला. बीएसई बास्केटमध्ये अडानी पोर्ट, मारुती, भारती एयरटेल, टीसीएस आणि रिलायन्स टॉप गेनर होते. तर ट्रेंट, एटरनल, पावरग्रिड, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंटमध्ये पडझड दिसली.
निफ्टी 100, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी आणि निफ्टी मिडकॅप 100 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 च्या शेअरमध्ये घसरण दिसली. गुरुवारी व्यापारी दिवशी बीएसई बास्केटमधून 13 शेअर हिरव्या रंगात न्हाऊन निघाले होते.तर 17 शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.
जागतिक बाजाराचा परिणाम
जागतिक बाजारात घसरणीचे संकेत मिळाल्याने भारतीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 शुक्रवारी घसरणीसह उघडला. आशियातील विविध बाजारात असेच सत्र दिसले. अमेरिकन शेअर बाजार रात्री घसरणीसह बंद झाला होता. तर काल भारतीय बाजारातही नफा वसूलीचे सत्र दिसून आले. जपानचा निक्केई 225.06 टक्क्यांनी घसरला. तर टॉपिक्स मंदावला. दक्षिण कोरियाचा कोस्पी 1.1 टक्क्यांच्या घसरणीवर आला. कोस्डॅकमध्ये 0.35 टक्क्यांची घसरण दिसून आली.
