AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तपोवननंतर कुसुमाग्रज उद्यानात झाडं तोडली; नाशिककरांची नाराजी

तपोवननंतर कुसुमाग्रज उद्यानात झाडं तोडली; नाशिककरांची नाराजी

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Feb 27, 2026 | 10:22 AM
Share

नाशिकमधील कुसुमाग्रज उद्यानात मलजल निस्सारिकरण केंद्रासाठी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचे शिलालेखही तोडल्याचा आरोप आहे. तपोवनमधील प्रकरण ताजे असतानाच या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कारवाईची मागणी केली जात आहे. हा प्रकार मराठी भाषा दिनापूर्वी घडल्याने अधिक चर्चा होत आहे.

नाशिकमध्ये तपोवन परिसरातील वृक्षतोडीचा वाद ताजा असतानाच आता कुसुमाग्रज उद्यानात मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्यात आली आहेत. मलजल निस्सारिकरण केंद्रासाठी जागा आरक्षित केल्याचे सांगत ही वृक्षतोड झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त करत प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नावावर असलेल्या या उद्यानात त्यांच्या कवितांचे शिलालेखही तोडण्यात आल्याचा आरोप आहे. हे उद्यान 2012 मध्ये नाशिक महापालिकेने उभारले होते. ही घटना कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या आणि मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे, ज्यानिमित्त नाशकात विश्व मराठी संमेलनाचेही आयोजन केले जात आहे. एका बाजूला मराठी भाषेचा जागर सुरू असताना, दुसरीकडे मराठी साहित्यातील मोठ्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित उद्यानाची अशी दुरवस्था झाल्याने नाशिककरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ही जागा प्रकल्पासाठी राखीव होती आणि झाडे तोडण्याशिवाय पर्याय नव्हता.

Published on: Feb 27, 2026 10:22 AM

Follow Us
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा