AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vayu Shakti 2026 : अफगाणिस्तान-पाकिस्तान युद्ध सुरु, इंडियन एअरफोर्स पाक बॉर्डरजवळ टाकणार 12 हजार किलोचे बॉम्ब

Vayu Shakti 2026 : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये भीषण युद्ध सुरु झालं आहे. अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे 55 सैनिक ठार झाले. त्यानंतर पाकिस्तानी प्रत्युत्तर म्हणून एअर स्ट्राइक केला. या दरम्यान आता इंडियन एअर फोर्स आज पाकिस्तानी सीमेजवळ 12 हजार किलोचे बॉम्ब टाकणार आहे.

Vayu Shakti 2026 : अफगाणिस्तान-पाकिस्तान युद्ध सुरु, इंडियन एअरफोर्स पाक बॉर्डरजवळ टाकणार 12 हजार किलोचे बॉम्ब
Rafale Image Credit source: PTI
| Updated on: Feb 27, 2026 | 10:36 AM
Share

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये बऱ्याच महिन्यांपासून तणाव सुरु होता. आता हा तणाव संघर्ष, युद्धामध्ये बदलू लागला आहे. रविवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. यात महिला, मुलांचा मृत्यू झाला. काल रात्री अफगाणिस्तानने पाकिस्तानी चौक्यांवर जबरदस्त हल्ला करुन एअर स्ट्राईकचा बदला घेतला. यात पाकिस्तानी सैन्याचे 55 सैनिक ठार झाल्याची माहिती आहे. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा काबूल, कंदहार येथे एअर स्ट्राइक केला. दोन्ही देशांमध्ये घनघोर युद्धाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तामध्ये संघर्ष सुरु असताना इंडियन एअर फोर्स आज ‘वायु शक्ति 2026’ युद्ध सराव करणार आहे.

हा IAF चा मोठा युद्ध सराव आहे. इंडियन एअर फोर्स पाकिस्तानी सीमेजवळ आपल्या हवाई शक्तीचं प्रदर्शन करणार आहे. या युद्ध सरावात राफेल, सुखोई-30 MKI, तेजस, मिराज-2000, जॅग्वार ही फायटर जेट्स त्याशिवाय प्रचंड, अपाचे, चिनूक ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स या युद्ध सरावात सहभागी होणार आहेत. एअर फोर्स जवळपास 12 हजार किलोचे बॉम्ब टाकणार आहे. एकूण 277 अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करुन आपल्या अचूक मारक क्षमतेचं प्रदर्शन करणार आहे.

रात्रीचं ऑपरेशन असेल

“व्यापक युद्धसराव IAF आपल्या अचूक मारक क्षमतेचं प्रदर्शन करेल. दहशतवाद अजिबात सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश यातून देण्यात येईल” असं एअरफोर्स उपप्रमुख एअर मार्शल नागेश कपूर म्हणाले. एकूण अडीच तासाच्या या युद्धा सरावात 277 शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात येईल. यात दिवसा, संध्याकाळी आणि रात्रीचं ऑपरेशन असेल.

नव्या पिढीच्या विमानांचा समावेश करण्यावर विचार

“ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल अन्य नायकांप्रमाणे एक नायक होता. एअर फोर्स अजून अत्याधुनिक फायटर जेटचा समावेश करण्यावर विचार करत आहे. इंडियन एअर फोर्स नव्या पिढीच्या विमानांचा समावेश करण्यावर विचार करत आहे. पण ती कुठल्या प्रकारची विमानं आहेत, यावर मी आत्ताच बोलणार नाही” असं एअर मार्शल कपूर म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने आपली हवाई शक्ती पाकिस्तानला दाखवून दिली. पाकिस्तानचे एअर बेसचे उडवून टाकले. त्यामुळे हवाई युद्ध लढण्याची त्यांची क्षमताच संपली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...