AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट

Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय… दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट

| Updated on: Jul 22, 2026 | 10:21 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवार यांच्यासोबतचे काही खास फोटो पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजित पवार यांच्यासोबतचे काही खास फोटो पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे.

पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे की, “तुमचा वाढदिवस आज ‘जयंती’ म्हणून साजरा करताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला आजही मन तयार होत नाही. अनेक वर्षे तुमचा वाढदिवस आनंदात, उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला. मात्र आज हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय.”

त्यांनी पुढे लिहिले की, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अजित पवार हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. कठीण प्रसंगी दिलेला आधार, साथ आणि प्रेम आजही प्रत्येक क्षणी जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. “तुम्ही शारीरिकदृष्ट्या आज आमच्यासोबत नसाल, तरी तुमचे विचार, लोकांप्रती असलेला सेवाभाव, शिस्त आणि दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात कायम जिवंत राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पोस्टच्या शेवटी सुनेत्रा पवार यांनी, “माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम,” असे लिहित अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, त्यांच्या या भावनिक पोस्टवर अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून प्रतिक्रिया उमटत असून, सोशल मीडियावर या पोस्टची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

 

Published on: Jul 22, 2026 10:21 AM

Follow Us