AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. विद्यार्थी आंदोलन आणि पेपर फुटीचे गंभीर प्रश्न चर्चेला आले. मोदींनी ट्विट करत भेटीचे फोटो शेअर केले. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. पवारांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. पावसाळी अधिवेशन आणि जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय वर्तुळात महत्त्वाची ठरली.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 11:49 AM
Share

दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या भेटीचे चार फोटो शेअर केले आहेत. या भेटीत पवार यांनी मोदींना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. पवार हे थोड्यावेळात माध्यमांशी भेटून या भेटीची माहिती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपली भेट घेतल्याचं म्हटलं आहे. संसदेत ही भेट झाल्याचं मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या भेटीचे मोदी यांनी चार फोटो शेअर केले आहेत. या भेटीत पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मोदींना दिली. तसेच पेपर फुटीबाबत काय उपाययोजना करता येईल याची चर्चाही या भेटीत झाल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर आपली भूमिकाही पवारांकडे मांडल्याचं सांगितलं जात आहे.

फोटोत काय दिसलं?

मोदींनी या भेटीचे चार फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत सुप्रिया सुळेही दिसत आहेत. मोदी आणि पवार चर्चा करताना या फोटोत दिसतंय. पवारांच्या हातात एक फाईल आहे. त्यातील एक कागद पवारांनी मोदींना दिल्याचं दिसत आहे. जंतरमंतरवरील आंदोलनाबाबतचं हे निवेदन असल्याचं सांगितलं जात आहे. मोदी हे कागद वाचताना दिसत आहेत. त्यानंतर या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. शेवटच्या फोटोत मोदी पवारांचे हात पकडून त्यांच्यासोबत चालताना दिसत आहे.

काल आंदोलनात

दरम्यान, सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर काल जंतरमंतरवर देशातील विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी दीपके यांची भेट घेऊन आंदोलकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. देशातील विरोधी पक्ष आंदोलकांच्या पाठीशी आहे, हे दाखवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते जंतमंतरवर आले होते. स्वत: शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा जंतरमंतरवर आले होते. त्यांनी दीपकेंची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच तुम्हाला काही मदतीची गरज आहे का? असा सवाल पवार यांनी केला दीपकेंना केला होता. त्यावर दीपके यांनी सध्या तरी मदतीची गरज नसल्याचं पवारांना सांगितलं होतं.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी