AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar Meet PM Modi : आज राजधानी दिल्लीत एक मोठी राजकीय घडामोड घडली. शरद पवार यांनी संसद भवनातील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
Pawar Modi Meet
| Updated on: Jul 22, 2026 | 12:08 PM
Share

आज राजधानी दिल्लीत एक मोठी राजकीय घडामोड घडली. शरद पवार यांनी संसद भवनातील कार्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे सोबत होत्या. शरद पवारांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. यामागे काही राजकीय कारणं आहेत का? असे अनेक प्रश्न आहेत. या भेटीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काल पवारसाहेब जंतर-मंतरवर गेले होते. तिथे आंदोलकांना भेटले. 22 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली असावी. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असेल” असं शशिकांत शिंदे म्हणाले.

“वेगळा अर्थ काढू नका. आंदोलनावर चर्चा होणं गरजेचं आहे” असं शशिकांत शिंदे म्हणाले. शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली असेल यावर शशिकांत शिंदे म्हणाले की, “मला कल्पना नाही. मी बघितलय त्यानुसार शरद पवार अनुभवी नेते आहेत. त्यांनी अनेक प्रश्नांवर पुढाकार घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे”

काल पवार अभिजीत दीपकेंना भेटले

शरद पवार यांनी कालच जंतर-मंतरवर जाऊन आंदोलन करणाऱ्या सीजेपी कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. अभिजीत दीपकेंशी स्वत: शरद पवार बोलले. आंदोलक विद्यार्थ्यांची विचारपूस केली. कारण सोमवारी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यावेळी आंदोलक विद्यार्थी आणि पोलीस दोघे जखमी झाले होते.

पवार NDA सोबत जाणार का?

शरद पवार भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जाणार अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट महत्वाची ठरते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांची मुंबईत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेट झाली होती. यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं. शरद पवार यांचे सर्वपक्षीय मित्र आहेत. शरद पवार सध्या महाविकास आघाडीमध्ये आहेत.

Follow Us
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू