AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड

Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड

| Updated on: Jul 22, 2026 | 10:49 AM
Share

कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)कडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. लोकलचे काही दरवाजे बंद पडल्यामुळे प्रवाशांना एकाच प्रवेशद्वारातून चढावे लागले आणि त्यामुळे मोठी गर्दी झाली.

एकाच गेटवर मोठ्या प्रमाणात प्रवासी जमा झाल्याने चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. कार्यालयीन वेळ असल्याने चाकरमान्यांची लोकलमध्ये चढण्यासाठी मोठी धावपळ सुरू होती. या गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हस्तक्षेप केला. पोलिसांनी संबंधित दरवाजा बंद करून प्रवाशांना सुरक्षितपणे व्यवस्थापित केले. त्यानंतर लोकल पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

दरम्यान, या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करण्यात येत असून, एसी लोकलच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Published on: Jul 22, 2026 10:49 AM

Follow Us