AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलनादरम्यान पतीला ताब्यात घेताच स्वरा भास्करची संतप्त पोस्ट; म्हणाली ‘लज्जास्पद..’

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतही आंदोलनं झाली. या आंदोलनादरम्यान अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमदला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याचा व्हिडीओ पोस्ट करत तिने संताप व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान पतीला ताब्यात घेताच स्वरा भास्करची संतप्त पोस्ट; म्हणाली 'लज्जास्पद..'
Swara Bhasker and Fahad AhmedImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 22, 2026 | 11:54 AM
Share

नीट पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी विद्यार्थ्यांचं आणि तरुणांचं आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं हे आंदोलन फक्त दिल्लीपुरतं मर्यादित नाही. सोमवारी मुंबईतही निदर्शने झाली आणि असंख्य लोक कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. या आंदोलनात अभिनेत्री स्वरा भास्करचा पती आणि राजकीय कार्यकर्ता फहाद अहमदचाही समावेश होता. या आंदोलनादरम्यान फहादला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर स्वराने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला.

स्वरा भास्करने फहादला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस आंदोलनादरम्यान फहादची कॉलर पकडून त्याला पोलीस व्हॅनमध्ये नेत असल्याचं दिसत आहे. तर फहात त्या अधिकाऱ्यांना विचारतोय, “तुम्ही मला का अटक करत आहात?” हा व्हिडीओ दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास रेकॉर्ड करण्यात आला होता. फहादचा व्हिडीओ शेअर करत स्वराने लिहिलं, ‘मुंबई पोलिसांनी 20 जुलै 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता चैत्यभूमी इथं फहाद आणि इतर आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्याला माहीम पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवण्यात आलं आहे. ही भारताची लोकशाही आहे. लज्जास्पद!’

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

आणखी एका व्हिडीओमध्ये फहाद पोलिसांच्या गाडीत बसून घटनास्थळावरील परिस्थितीचं वर्णन करताना दिसत आहे. स्वरानेही त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. फहादनेच व्हिडीओ शेअर करण्यास सांगितल्याचं म्हणत स्वराने इतर आंदोलकांनाही त्याठिकाणी शांतपणे जमण्याचं आव्हान केलं.

कॉक्रोच जनता पार्टीने सोमवारी दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चा काढला. या मोर्चात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले होते. अभिनेत्री शबाना आझमी, प्रकाश राज हे आंदोलनात दिसले. शबाना आझमी यांनी इन्स्टाग्रामवर आंदोलनाचे अनेक व्हिडीओ शेअर केले होते. आंदोलनादरम्यान त्यांची तब्येतही बिघडली होती. त्यानंतर काहींनी त्यांची मदत करत त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले होते.रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनीही टविट करून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला. याशिवाय अभिनेता-गायक दिलजित दोसांज, अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेश यांनीही विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला.

Follow Us
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग....
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर मोठं संकट, 4-5 दिवसांत पाऊस नाही तर...
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Laxman Hake | हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार! लक्ष्मण हाकेंनी GR जाळून सरकारला सुनावलं
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
Asim Sarode | शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
भुजबळांसह 3 मंत्र्यांचा ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून बहिष्कार
OBC Reservation | ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठा राडा! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून बहिष्कार; निधीवरून सरकारला घेरलं
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
महागाईचा भडका कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुळेंनी सरकारला घेरलं
Supriya Sule | सण तोंडावर, महागाईचा भडका! कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं