AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Stock: कमाईची मोठी संधी, तुम्हालाही लागू शकते लॉटरी, हा सरकारी रेल्वे स्टॉक चर्चेत

Railway Stock: ही सरकारी रेल्वे कंपनी सध्या चर्चेत आहे. या रेल्वे कंपनीतील वाटा विकणार आहे. कंपनीतील 4% वाटा सरकार विकणार असल्याचे समजते. सरकारच्या निर्णयानंतर हा शेअर घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

Railway Stock: कमाईची मोठी संधी, तुम्हालाही लागू शकते लॉटरी, हा सरकारी रेल्वे स्टॉक चर्चेत
आयआरएफसी शेअरImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 26, 2026 | 3:29 PM
Share

IRFC Share Price, IRFC OFS: रेल्वे कंपनी, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (IRFC) गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने ऑफर फॉर सेलच्या (OFS) माध्यमातून रेल्वे कंपनीतील 4% पर्यंतचा वाटा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदर 2% वाटा विक्रीपासून सुरुवात होत होती. यामध्ये 2% आणि ग्रीन शूचा पर्याय मिळेल. ही ऑफर बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी उघडली. किरकोळ गुंतवणूकदारासाठी ऑफर गुरुवारी, 26 फेब्रुवारी रोजी उघडेल. या शेअरची फ्लोअर प्राईस ही 104 प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. सरकारच्या या मोठ्या निर्णयानंतर IRFC च्या शेअर्समध्ये विक्री सुरू केली. बुधवारी, 25 फेब्रुवारी रोजी बाजार उघडल्यावर हा स्टॉक BSE वर 3.75% खाली 105.30 रुपयांवर व्यापार करतो. लिस्टिंगनंतर 2 वर्षांत गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिला. पण त्यानंतर स्टॉकमध्ये सातत्याने लाल रंगात न्हाऊन निघाला आहे.

IRFC OFS: सरकार वाटा विक्री करणार

सरकारने मंगळवारी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनमधील (IRFC) 4% पर्यंत वाटा विक्री करण्याचे जाहीर केले. ऑफर फॉर सेलची (OFS) सरकारने घोषणा केली आहे. या ऑफरअतंर्गत केंद्र सरकारने सुरुवातीला 2% वाटा विक्री करेल. यामध्ये 2% अतिरिक्त ग्रीन शू पर्याय पण आहे. ही ऑफर बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी उघडली. किरकोळ गुंतवणूकदारासाठी ऑफर गुरुवारी, 26 फेब्रुवारी रोजी उघडेल. आज अशा गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी मानल्या जात आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) X वर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन(IRFC) ऑफर फॉर सेल काल नॉन-रिटेल इन्वेस्टर्ससाठी उघडले. तर आज किरकोळ गुंतवणूकदार त्यासाठी बोली लावू शकतात. बेस ऑफरमध्ये 26 कोटी शेअर आहेत. जे एकूण पेड-अप इक्विटी शेयर कॅपिटलच्या 2% आहे. सध्या या कंपनीत सरकारचा 86.36% टक्के वाटा आहे. शेअर विक्री केल्यानंतर या कंपनीत सरकारची हिस्सेदारी कमी होऊन ती 82.36% येईल.

IRFC OFS Floor Price: या भावावर होईल विक्री

ओवरसब्सक्रिप्शन पर्यायातून 26.14 कोटी इक्विटी शेअर विक्री होणार आहे. त्यामुळे संभावित निर्गुंतवणूक 4% होईल. OFS अंतर्गत फ्लोर प्राइस 104 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे. मंगळवारी 24 फेब्रुवारी रोजीच्या बाजारातील बंद भावापेक्षा ही किंमत 4.95% कमी आहे. IRFC चा शेअर 24 फेब्रुवारी रोजी 109.40 रुपये प्रति शेअरवर बंद झाला.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.