AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : विजयानंतरही टेन्शन, टीम इंडियाची चिंता कायम, पॉइंट्स टेबलचं चित्र काय?

T20 World Cup 2026 Points Table: आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत ए ग्रुपमधील 3 संघांनी विजय मिळवला आहे. तर झिंबाब्वेचं सलग 2 पराभवांमुळे आव्हान संपुष्टात आलं आहे.

T20 World Cup 2026 : विजयानंतरही टेन्शन, टीम इंडियाची चिंता कायम, पॉइंट्स टेबलचं चित्र काय?
India vs Zimbabwe HandshakeImage Credit source: PTI
| Updated on: Feb 27, 2026 | 9:55 AM
Share

टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मोहिमेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 76 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलं. भारताला या पराभवामुळे मोठा फटका बसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा भारताच्या नेट रनरेटवर परिणाम झाला. त्यामुळे सेमी फायनलच्या हिशोबाने भारताचं टेन्शन वाढलं. त्यामुळे भारतासाठी झिंबाब्वे विरुद्धचा सामना करो या मरो असा होता. भारताने गुरुवारी झिंबाब्वेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला.भारताने या विजयासह सेमी फायनलच्या शर्यतीतील आपलं आव्हान कायम ठेवलं. मात्र या विजयांनतर भारताची धाकधूक कायम आहे. भारत विरुद्ध झिंबाब्वे सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलचं चित्र काय आहे? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया झिंबाब्वेला रोखण्यात अपयशी

टीम इंडियाने झिंबाब्वेसमोर 257 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकून नेट रनरेटमध्ये सुधारणा करण्याची नामी संधी होती. मात्र भारतीय गोलंदाज झिंबाब्वेला ऑलआऊट करण्यात आणि मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले. झिंबाब्वेने फटकेबाजी करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 184 धावा केल्या. त्यामुळे भारताला फक्त 72 धावांनीच विजय मिळवता आला. त्यामुळे भारताला नेट रनरेटमध्ये काही खास फायदा झाला नाही. झिंबाब्वेचं या पराभवानंनतर आव्हान संपुष्टात आलं. तर भारताच्या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

टीम इंडिया तिसऱ्या स्थानी

टीम इंडिया या विजयानंतरही ए ग्रुपमधून पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर विंडीज 2 सामन्यांमधील एका विजयानंतरही दुसऱ्या स्थानी कायम आहे. ए ग्रुपमधून उपांत्य फेरीतील एका जागेसाठी भारत आणि विंडीजमध्ये टफ फाईट आहे. आता भारत आणि विंडीज दोन्ही संघ सुपर 8 फेरीतील आपला शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे.

दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानी

ए ग्रुपचं पॉइंट्स टेबलचं चित्र

दक्षिण आफ्रिका या स्पर्धेतील दहाव्या पर्वात अजिंक्य आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळीनंतर सुपर 8 फेरीत खेळलेले 2 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया आणि विंडीजला पराभूत केलंय. दक्षिण आफ्रिका 2 सामन्यानंतर 4 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. विंडीज टीम इंडियाप्रमाणे 2 गुण असूनही फक्त नेट रनरेट चांगला असल्याने दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारतीय संघ तिसऱ्या तर झिंबाब्वे चौथ्या स्थानी आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...