AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा विजय आणि दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं रिटर्न गिफ्ट, झिम्बाब्वे स्पर्धेतून आऊट

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला धावांनी पराभूत केलं. यासह आता उपांत्य फेरीची रंगत वाढली आहे. भारत वेस्ट इंडिज सामन्यातील विजेत्याला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण झिम्बाब्वेचा फैसला झाला आहे.

टीम इंडियाचा विजय आणि दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं रिटर्न गिफ्ट, झिम्बाब्वे स्पर्धेतून आऊट
टीम इंडियाचा विजय आणि दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं रिटर्न गिफ्ट, झिम्बाब्वे स्पर्धेतून आऊट Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 10:36 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यात भारत आणि झिम्बाब्वे हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमवून 256 धावा केल्या. तसेच विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. झिम्बाब्वेने 20 षटकात 6 गडी गमवून 184 धावा केल्या. भारताने हा सामना 72 धावांनी जिंकला.  यामुळे झिम्बाब्वेचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. झिम्बाब्वेचा सलग दोन सामन्यात पराभव झाल्याने या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. झिम्बाब्वेने साखळी फेरीत चांगली कामगिरी केली होती. या खेळीच्या जोरावर त्यांनी सुपर 8 फेरीत पहिल्यांदाच जागा मिळवली होती. पण सुपर 8 फेरीत पदरी निराशा पडली. पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने दारूण पराभव केला. त्यानंतर भारताने पराभवाची धूळ चारली. आता या स्पर्धेचा शेवट झिम्बाब्वे कसा करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दक्षिण अफ्रिकेला मिळालं रिटर्न गिफ्ट

दुसरीकडे, भारताच्या विजयाने दक्षिण अफ्रिकेला रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. भारताच्या विजयामुळे दक्षिण अफ्रिकेचं उपांत्य फेरीतील स्थान पक्कं झालं आहे. दक्षिण अफ्रिकेने भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांना पराभूत करत उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना हा औपचारिक असणार आहे. पण भारत आणि वेस्ट इंडिजसाठी करो या मरोची लढाई असेल.

करो या मरो सामना

तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसऱ्या संघासाठी चुरस असणार आहे. हा सामना 1 मार्चला होणार आहे. या सामन्यात विजय हा एकमेव पर्या असणार आहे. त्यामुळे नेट रनरेट वगैरे काहीच भानगड नसेल. त्यामुळे विजयाचं गणित सोडवण्याचं आव्हान असणार आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकताच उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार नाही हे पक्कं आहे.  कारण भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिल. त्यामुळे इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी सामना होईल. तर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...