AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण अफ्रिकेमुळे टीम इंडियाला उपांत्य फेरीची संधी! पण आता एक गणित सोडवणं आवश्यक, जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील महत्त्वाचा सामना दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात पार पडला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. त्यामुळे टीम इंडियाच्या उपांत्य फेरीच्या आशा स्पष्टपणे वाढल्या आहेत. कसं ते समजून घ्या

दक्षिण अफ्रिकेमुळे टीम इंडियाला उपांत्य फेरीची संधी! पण आता एक गणित सोडवणं आवश्यक, जाणून घ्या
दक्षिण अफ्रिकेमुळे टीम इंडियाला उपांत्य फेरीची संधी! पण आता एक गणित सोडवणं आवश्यक, जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 6:35 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने रंगतदार वळणावर आले आहेत. कारण उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी चुरशीची लढाई आहे. गट 1 मध्ये उपांत्य फेरीचं गणित अजूनही सुटलेलं नाही. दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्कं केलं आहे. भारत झिम्बाब्वे सामन्याचा निकाल काहीही लागला तरी दक्षिण अफ्रिका उपांत्य फेरीत असेल. तर वेस्ट इंडिज, भारत आणि झिम्बाब्वे हे उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. झिम्बाब्वेचा नेट रनरेट पाहता उपांत्य फेरी गाठणं काही सोपं नाही. पण एखाद्याचं गणित बिघडवू शकतो. दरम्यान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 8 गडी गमवून 176 धावा केल्या. तसेच 177 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं कठीण वाटत होतं. पण दक्षिण अफ्रिकेने हे आव्हान सहज गाठलं. पावर प्लेमध्ये दक्षिण अफ्रिकेने हा सामना वेस्ट इंडिजच्या हातून खेचून घेतला. दक्षिण अफ्रिकेने 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दक्षिण अफ्रिकेच्या विजयामुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा वाढल्या आहेत. कसं काय ते गणित समजून घ्या

…तर भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा

भारताचा सुपर 8 फेरीतील दुसरा सामना झिम्बाब्वेशी होत आहे. या सामन्यात सर्व प्रथम झिम्बाब्वेला पराभूत करणं भाग आहे. जर तसं झालं तर नेट रनरेटचं गणित नसेल. झिम्बाब्वेला पराभूत केल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यासाठी तयार राहावं लागणार आहे. कारण भारत आणि वेस्ट इंडिज या सामन्यात नेट रनरेटचं गणित राहणार नाही, तर विजयावर अवलंबून राहील. जर तसं झालं तर भारत वेस्ट इंडिज सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. म्हणजेच भारताला उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

दरम्यान, झिम्बाब्वेला कमी लेखणं परवडणारं नाही. कारण झिम्बाब्वेने साखळी फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे भारतीय संघाने ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. आता टीम इंडियाची कामगिरी कशी होते याकडे लक्ष असेल. भारताने झिम्बाब्वे सामन्याचा निकाल लागल्यानंतर दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे.

Follow Us
चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप
चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप.
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊत म्हणाले अधिकृत निर्णय नाही
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊत म्हणाले अधिकृत निर्णय नाही.
महिला आरक्षणावर ठाकरेंची शिवसेना ठाम; मिस कॉलवर राऊतांचे प्रत्युत्तर
महिला आरक्षणावर ठाकरेंची शिवसेना ठाम; मिस कॉलवर राऊतांचे प्रत्युत्तर.
प्रतिभा चाकणकरांची चौकशी, रुपाली चाकणकरांना नोटीस का नाही?
प्रतिभा चाकणकरांची चौकशी, रुपाली चाकणकरांना नोटीस का नाही?.
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.