AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs WI : टीम इंडियाच्या मनासारखं! दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला 9 विकेट राखून केलं पराभूत

T20 World Cup 2026, Super 8 SA vs WI : दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला गडी राखून पराभूत केलं. वेस्ट इंडिजने विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 9 गडी गमवून पूर्ण केलं.

SA vs WI : टीम इंडियाच्या मनासारखं! दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला 9 विकेट राखून केलं पराभूत
Image Credit source: Proteas Men Twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 6:21 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मधील तिसरा सामना दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला.  या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 8 गडी गमवून 176 धावा केल्या. तसेच विजयासाठी 177 धावांंचं आव्हान दिलं. खरं तर वेस्ट इंडिजच्या 87 धावांवर 7 विकेट गेल्या होत्या. पण रोमारियो शेफर्डने आठव्या विकेटसाठी झंझावाती अर्धशतक केलं आणि वेस्ट इंडिज संघाला 176 धावांपर्यंत पोहोचवलं. हे आव्हान गाठणं दक्षिण अफ्रिकेला कठीण जाईल असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. वेस्ट इंडिजचे गोलंदाज विकेटसाठी धडपडत होते. पावर प्लेमध्ये विकेट मिळाली नाही, त्यामुळे सामना हातून वाळूसारखा सरकत गेला.  हा सामना दक्षिण अफ्रिेकेने 17व्या सामन्यात जिंकला.

दक्षिण अफ्रिकेचा डाव

वेस्ट इंडिजने विजयासाठी 177 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात केली. पावर प्लेमध्ये दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना धुतलं. क्विंटन डीकॉक आणि एडन मार्करम यांनी पावर प्लेच्या सहा षटकात 69 धावा केल्या. या जोडीने पुढेही आक्रमक सुरुवात कायम ठेवली. 48 चेंडूत या जोडीने 95 धावा केल्या. पण क्विंटन डी कॉकच्या रुपाने पहिला धक्का बसला. 24 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारून 47 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार एडन मार्करमचा झंझावात सुरूच राहिला. त्याने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेला काही विकेट मिळाली नाही. एडन मार्करमने 46 चेंडूत नाबाद 82, तर रियान रिकल्टनने 28 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या.

वेस्ट इंडिजचा डाव

वेस्ट इंडिजला पहिला धक्का 29 धावांवर बसला होता. शाई होप 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर धडाधड विकेट पडल्या. शिमरोन हेटमायर या सामन्यात काही खास करू शकला नाही. फक्त 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर ब्रँडन किंग 21 धावा, रोस्टन चेस 2, शेरफन रुदरफोर्ड 12, रोवमॅन पॉवेल 9 आणि मॅथ्यू फोर्डे 11 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर आठव्या विकेटसाठी रोमारियो शेफर्ड आणि जेसन होल्डर ही जोडी टिकली. या जोडीने 57 चेंडूत 89 धावांची खेळी केली. जेसन होल्डर 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत 49 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोमारियो शेफर्डने 37 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 52 धावा केल्या. या जोडीच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजला सन्मानजनक स्कोअर करता आला आला.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ