AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: अभिषेक बाहेर, संजू सॅमसनला संधी! प्लेइंग 11 मध्ये असा बदल कोणी सुचवला?

टी20 वर्ल्डकप 2026 सुपर 8 फेरीत भारताचा सामना झिम्बाब्वेशी होत आहे. हा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात विजयासोबत नेट रनरेटही राखणं गरजेचं आहे. असं असताना टीम इंडियाचा दिग्गज आक्रमक फलंदाजाने प्लेइंग 11 बाबत भाष्य केलं आहे.

IND vs ZIM: अभिषेक बाहेर, संजू सॅमसनला संधी! प्लेइंग 11 मध्ये असा बदल कोणी सुचवला?
IND vs ZIM: अभिषेक बाहेर, संजू सॅमसनला संधी! प्लेइंग 11 मध्ये असा बदल कोणी सुचवला? Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 4:24 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानला जात होता. पण मागच्या काही सामन्यातील कामगिरी पाहता आता तसं म्हणणं चुकीचं ठरलं आहे. सुपर 8 फेरीतील दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्या भारताचा 76 धावांनी पराभव झाला. त्यामुळे उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात लढत होणार आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकला तर टीम इंडिया उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहणार आहे. त्यामुळे या सामन्यात प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत चर्चा रंगली आहे. कारण गेल्या सामन्यात टीम इंडियाची हाराकिरी झाली आहे. या सामन्यात अभिषेक शर्माला ठेवायचं की संजू सॅमसनला संधी द्यायची हे यावरून चर्चा रंगली आहे. कारण अभिषेक शर्मा आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात फेल गेला आहे. त्यामुळे त्याला ड्रॉप करण्याची मागणी होत आहे. असं असताना या चर्चेत आता दिग्गज ओपनर वीरेंद्र सेहवागने उडी घेतली आहे. त्याने थेट अभिषेक शर्माला प्लेइंग 11 मधून डावलण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाला संजू सॅमसन?

टीम इंडियाला झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळेल की नाही हे सांगणं आता कठीण आहे. कारण भारतीय फलंदाजीवरचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यात ओपनर अभिषेक शर्माची फलंदाजी हवी तशी झाली नाही. या स्पर्धेत तीन वेळा खातंही खोलू शकलं नाही. ही स्थिती पाहता माजी ओपनर वीरेंद्र सेहवागने अभिषेक शर्माला डावलण्याच्या सूचना दिल्या आहेत. क्रिकबझच्या कार्यक्रमात सेहवागने सांगितलं की, ‘जर मी असतो तर अभिषेक शर्माला ब्रेक दिला असता आणि संजू सॅमसनला संधी दिली असती. कारण हा एकच सामना असा की त्यात प्रयोग करू शकतो. जर हरलो तर मग शेवटी कोणालाही खेळवा. यासाठी फॉर्ममध्ये असलेल्या बेस्ट इलेव्हनला उतरवा.’

वीरेंद्र सेहवागने बॅटिंग ऑर्डरमध्येही बदल करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्याने सांगितलं की, ‘मला वाटतं की सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावा. तसेच तिलक वर्माने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. किंवा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनच्या हिशेबाने किंवा बॉलर्सच्या हिशेबाने फलंदाजीला पाठवावं. सर्वात महत्त्वाचं आहे की बिंधास्त खेळावं. असं वाटते की भारतीय संघ दबावात खेळत आहे. फलंदाजांना आऊट होण्याचा दबाव वाटत आहे.’

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...