AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS on CJP Protest : ब्रिटिश उपोषण कर्त्यांना भेटायला तरी जायचंय मात्र हे… मनसे नेते संदीप देशपांडे मोदी सरकारवर तुटून पडले

MNS on CJP Protest : सीजेपी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. काल शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांनी उपोषणस्थळी धाव घेत आंदोलकांची विचारपूस केली. तर सरकारच्या भूमिकेवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

MNS on CJP Protest : ब्रिटिश उपोषण कर्त्यांना भेटायला तरी जायचंय मात्र हे... मनसे नेते संदीप देशपांडे मोदी सरकारवर तुटून पडले
सीजेपी आंदोलन, मनसे नेते संदीप देशपांडे
| Updated on: Jul 22, 2026 | 9:37 AM
Share

Sandeep Deshpande on CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी परवा दिल्लीत लाठीहल्ला केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. पोलिसांच्या कृतीवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी रान उठवले आहे. काल शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांनी उपोषणस्थळी धाव घेत आंदोलकांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे.

यांच्यापेक्षा ब्रिटिश बरे

जे आंदोलन करत आहे, त्यांचा ऐकून घेतलं पाहिजे. आपल्या घरी देखील मुले चिडतात, मग आपण त्यांना लाठ्यांनी मारत नाही. त्यांच्याशी बोलतो. त्यांचा काही दु:ख ते ऐकून घेतो. हे सरकार दडपशाही आणि हुकूमशाही आहे. तुम्ही हिटलर पेक्षा बत्तर झालेले आहात. ब्रिटिश उपोषण कर्त्यांना भेटायला तरी जायचंय मात्र हे सरकार बत्तर सरकार आहे, अशी जोरदार टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. एरवी तुम्ही मन की बात करताना मग आता काय झालं असा सवाल त्यांनी केला.

आज आझाद मैदानात आंदोलन

आम्ही देखील या सरकार विरोधात आज आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. महानगरपालिका बोलते की झाड पडून एका मुलाचा मृत्यू झाला यात दोष कोणाचाच नाही का, असा सवाल करत त्यांनी आज आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले.

ही हुकूमशाही चालणार नाही

या आंदोलनाला विरोधकांचा मोठा पाठिंबा मिळतोय. राज ठाकरे यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ही हुकूमशाही चालणार नाही. उद्धव ठाकरे देखील जंतरमंतर या ठिकाणी गेले होते. इतर नेतेही तिथे पोहचले. सर्व विरोधक आणि सत्ताधारी यांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे ही मुलं आपली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या आंदोलन ठिकाणी जाणार आहेत की नाही, याचा निर्णय ते घेतली असे संदीप देशपांडे म्हणाले.

डायर नाही कायर पाहिला

काल संदीप देशपांडे यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. जालियनवाला बाग हत्याकांड घडवणारा जनरल डायर आम्ही पाहिला नाही. पण जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनानंतर कायर पाहिला अशी जहरी टीका देशपांडे यांनी केली होती. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर मोठा आक्षेप घेतला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...