AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. 20 जुलै 2026 रोजी या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालेले दिसले. आता यानंतर अनेकांनी या प्रकरणावर आपली मते मांडली आहे. यातच आता जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने ही यावर आपले मत मांडले आहे.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं...विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली
| Updated on: Jul 22, 2026 | 9:46 AM
Share

नुकत्याच झालेल्या पेपरफुटीच्या निषेधार्थ ‘कॉकरोच जनता पार्टी’ दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. 20 जुलै रोजी, आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. हजारो विद्यार्थी आणि तरुण जमले होते. संसदेकडे पुढे सरकणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फेकल्या. आता यानंतर आंदोलन चिघळले. या आंदोलनाचा हिंसकवळण प्राप्त झाल्यानंतर अनेकांनी यावर भाष्य केले. अनेक सेलिब्रिटींना यानंतर या आंदोलकांसाठी आपला पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाबद्दल भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने या घटनेबद्दल आता एक विधान केले आहे.

आयसीसी प्रेझेंटर संजना गणेशनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने म्हटले आहे की, “हे जर आंदोलनापासून दूर बसलेल्या सहा वर्षांच्या मुलासोबत घडू शकते, तर ते कोणासोबतही घडू शकते. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत अश्रुधुराच्या धुरामुळे मुलांचा श्वास गुदमरतो, ही बाब कधीही सामान्य मानली जाऊ नये. शांततापूर्ण नागरिकांनी त्यांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या यंत्रणेलाच घाबरून जगण्याची वेळ येऊ नये.”

जंतर मंतरवर काय घडले?

20 जुलै रोजी दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनादरम्यान, शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि रोजगार सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवरून तरुणांनी आंदोलन केले. आंदोलकांनी संसद भवनाकडे मोर्चा वळवला, त्यामुळे जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुरा नळकांड्यांचा वापर करावा लागला. आंदोलकांमध्ये काही मुलांचाही समावेश होता आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर, अनेक सेलिब्रिटी व्यक्तींनी या विषयावर प्रतिक्रिया देत आहेत. अजूनही हे आंदोलन सुरु आहे. आंदोलकांची एकच मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी याच्या पदाचा राजीनामा द्यावा. पण अजून यावर काहीच अपडेट आलेली नाही.

आता काल या आंदोलनात राहुल गांधी, सोनिया गांधी पण सामील झाले होते. शरद पवारही या आंदोलकांना भेटायला आले होते. ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे अभिजीत दिपके आणि आंदोलकांची भेट घेण्यासाठी काल जंतर मंतरवर गेले होते.

Follow Us
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन... संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...