AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20 मध्ये भाजप खासदाराच्या लेकीची धमाकेदार एन्ट्री, त्याआधी काय घडलं?

Bigg Bosss 20 : 'बिग बॉस 20' रविवार म्हणजे 6 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. अशात यंदाच्या सिझनमध्ये कोणते स्पर्धक आहेत, हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, यंदाच्या सिझनमध्ये भाजप खासदाराच्या लेकीची एन्ट्री होणार आहे, त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

Bigg Boss 20 मध्ये भाजप खासदाराच्या लेकीची धमाकेदार एन्ट्री, त्याआधी काय घडलं?
Bigg Boss 20
| Updated on: Sep 06, 2026 | 10:36 AM
Share

Bigg Bosss 20 : अभिनेता सलमान खान याचा लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘बिग बॉस 20’ आज पासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शो पुन्हा नव्याने सुरु होणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शोचा प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी ‘कलर्स टीव्ही’ आणि ‘जिओहॉटस्टार’ (JioHotstar) वर होणार आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात, निर्माते शोमधील स्पर्धकांची नावे एकामागून एक जाहीर करत आहेत. आता, भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खाजदार मनोज तिवारी यांची मुलगी रीती तिवारी हिने ‘बिग बॉस 20’ मध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे.

लेकीला बिग बॉसच्या घरात सोडण्यासाठी पोहोचले मनोज तिवारी?

जियो हॉटस्टारने ‘बिग बॉस 20’ शो चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. जेथे रीती हिला सोडण्यासाठी मनोज तिवारी आले. ‘रिंकिया के पापा’ गाणं गात त्यांनी स्टेजवर प्रवेश केला. त्यानंतर सलमान खान म्हणतो, ‘मी आता तथास्तू बोललो तर तुम्ही विचार कराय या शोमध्ये दोन  वेळा येऊ शकतो…’, यावर मनोज तिवारी म्हणाले, ‘मी माझ्या लेकीला बिग बॉसच्या घरात सोडायला येणार आहे…’, सध्या व्हिडीओ व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by JioHotstar (@jiohotstar)

सध्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अनेकांनी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. निर्मात्यांनी आता स्वतः रीती हिच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. आता तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. सांगायचं झालं तर, यापूर्वी मनोज तिवरी देखील ‘बिग बॉस 4’मध्ये झळकले होते.

तेव्हा देखील सलमान खान याने होस्ट केलं होतं. त्या सीझनमध्ये डॉली बिंद्रासोबतचा त्यांचा ‘अंड्यावरून झालेला वाद’ विशेष चर्चेत राहिला होता आणि श्वेता तिवारी हिने ट्रॉफी जिंकलेली होती. सांगायचं झालं तर, मनोज तिवारी आणि श्वेता तिवारी यांच्या मैत्रीच्या चर्चा देखील तुफान रंगल्या होत्या. त्यामुळे शो तुफान चर्चेत आलेला.

कधी आणि कुठे पाहता येणार ‘बिग बॉस 20’

रीती तिवारी हिच्या सोबतच ‘बिग बॉस 20’ मध्ये मेरी कॉम, माही विज, फैजल खान, काजी तौकीर, कुशाल तन्वर, आम्रपाली दुबे, कनिका मान, ईशा रिखी, खुशी दुबे, अमन गांधी, अर्शिफा खान, उदिति सिंह, शौविक चक्रवर्ती आणि गीता बसरा यांसारखे सेलिब्रिटी दिसणार आहेत. तर ‘बिग बॉस 20’ चा ग्रँड प्रीमियर 6 सप्टेंबर 2026 मध्ये रात्री 9 वाजता होणार आहे. शो जियो हॉटस्टार आणि कर्लस टीव्हीवर पाहता येणार आहे.


Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ