AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांना मोठे यश, तीन जणांना..

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या घटनेने एकच मोठी खळबळ उडाली. त्यातच या प्रकरणात मोठे खुलासे होताना दिसत आहेत. पोलिसांनी अजून तीन जणांना ताब्यात घेतले.

अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांना मोठे यश, तीन जणांना..
Tiger Shroff
| Updated on: Oct 23, 2026 | 7:28 AM
Share

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर मुंबईतील जुहू येथे हल्ला करण्यात आला. तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. तीन आरोपी अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर कशाप्रकारे हल्ला करत होते, हे स्पष्टपणे दिसत होते. यादरम्यानच व्हिडीओही व्हायरल झाली. टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला करण्यापूर्वी बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या घराची रेकी या हल्लेखोरांकडून करण्यात आली. अमिताभ बच्चन, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार या कलाकारांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त आणि कडक सुरक्षा असल्याचे लक्षात येताच या कलाकारांनी टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला करण्याचे ठरवले. कोणालाही संशय येऊ नये, याकरिता अंधेरीत सतत आरोपी हॉटेल बदलत होते. मुंबईजवळ त्यांनी गोळीबाराचाही सराव केला. टायगर श्रॉफ याच्यावर अत्यंत जवळून हल्ला करण्यात आला. या प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत.

त्यातच आता टायगर श्रॉफ प्रकरणात आणखीन तीन जणांना क्राईम ब्रँच हरियाणा येथून अटक करण्यात आलीये. या हल्ल्यामागील नेटवर्क वाढताना दिसत आहे. पैसे आणि शस्त्र पुरवल्याचा आरोप यांच्यावर आहे. टायगर श्रॉफ प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने अजून तीन जणांना हरियाणा येथून ताब्यात घेतलेला आहे. समीर, जतीन आणि अंकित असे या तीन आरोपींची नावे आहेत.

यामध्ये समीर याचा हल्ल्याच्या प्लॅनिंगमध्ये सहभाग दिसून येत आहे. समीर याने अनिल पंडित व शूटर रेहान यांच्यासोबत मध्यस्थी करून त्यांना पैसे व शस्त्र पुरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. सध्या तीनही आरोपींना खंडणी विरोधी पथक या ठिकाणी ठेवण्यात आलेले असून आज दुपारी त्यांना किल्ला कोर्टात हजर करणार आहेत.

या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकचा तपास करत आहेत. एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. तीनही मुख्य आरोपी पोलिस कोठडीत आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांना या प्रकरणात अजून अधिकचा तपास करायचा आहे. आरोपींनी वापरलेली दोन फोन पोलिसांना शोधायची आहेत.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ