टायगर श्रॉफ याच्या आईचा मोठा निर्णय, लेकावरील हल्ल्यानंतर थेट..
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मोठा हल्ला झाला. त्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तो जखमी झाला. आता टायगर श्रॉफच्या आईने लेकावरील गोळीबारानंतर मोठा निर्णय घेतला. टायगरच्या आईचे काैतुक केले जात आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्या प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे आली. हल्लेखोरांचे टार्गेट टायगर श्रॉफ नव्हता. मोठे कलाकार त्यांच्या निशाण्यावर होते. मात्र, अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या घराची सुरक्षा पाहून त्यांनी काही बदल केले आणि टायगर श्रॉफकडे आपल्या मोर्चा वळवला. सात दिवसांच्या रेकीनंतर जुहू येथे त्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. लोक गाडीच्या आजुबाजूला मोठ्या संख्येने असतानाही गोळीबार करण्यात आला. त्यातच आता टायगर श्रॉफच्या आईने रुग्णालयात जखमी असलेल्या कंटेंट क्रिएटरची भेट घेतली. ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी तो तिथे होता. त्याला या हल्ल्यानंतर दुखापत झाल्याची माहिती मिळतंय.
हेच नाही तर टायगर श्रॉफच्या आईने त्याला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मिळतंय. अभिनेता टायगर श्रॉफची आई आयेशा यांनी मंगळवारी केईएम रुग्णालयात गोळीबारातील पीडित कंटेंट क्रिएटर उमेश चौहान यांची भेट घेतली. या दरम्यान चौहानला लागणारी आर्थिक मदतीचे आश्वासन आयेशा श्रॉफ यांनी दिले. श्रॉफ यांनी चौहानला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
मानखुर्द येथील व्लॉगर असलेले चौहान टायगर श्रॉफ फुटबॉल खेळून परतल्यानंतर त्याचे व्हिडीओ काढत होते. तेव्हा त्याला श्रॉफ बसलेल्या गाडीजवळ एक आवाज ऐकू आला. चौहानला छातीत दुखू लागण्यापूर्वी आणि गुदमरल्यासारखे वाटण्यापूर्वी त्याला वाटले की, सुरुवातीला गाडीचे टायर फुटले असावे, त्यामुळे धूर आणि मोठा आवाज आला.
हृदयविकाराचा झटका येत आहे असे वाटून लागल्याने त्याने आपल्या मित्रांना छातीवर दाब देण्यास सांगितले. नंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या छातीत गोळी घुसली आहे. त्यांच्या मित्रांनी त्यांना तात्काळ कूपर रुग्णालयात नेले. नंतर त्यांना केएएम रुग्णालयात पाठवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातच टायगर श्रॉफच्या आईने पिडिताची भेट घेत मदतीचे आश्वासन दिले आहे.
