AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election 2026 Voting LIVE: आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान, उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद

| Updated on: Oct 23, 2026 | 7:47 AM
Share

Maharashtra MLC Election 2026 Voting LIVE News Updates in Marathi: आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. 182 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर(मराठवाडा), पुणे या पाच मतदारसंघासाठी मतदान होईल. 27 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होईल.

Maharashtra MLC Election 2026 Voting LIVE: आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान, उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद
आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Oct 2026 07:45 AM (IST)

    नागपूरमध्ये उमेदवार सुधाकर कोहळे यांचं औक्षण

    नागपूर पदवीधर निवडणुकीत मतदानाला जाण्यापूर्वी भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचं औक्षण करण्यात आले. विधीवत पुजा औक्षण झाले. नात दर्शिता आणि कुटुंबियांनी औक्षण केले. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत आज पार पडणार मतदान होईल. या निवडणुकीसाठी नागपूरमध्ये मोठी चुरस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातील निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

  • 23 Oct 2026 07:37 AM (IST)

    बॅलेट पेपरवर पसंती क्रमांक लिहून मतदान

    या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने चुरस वाढलेली आहे. अमरावती विभागात काँग्रेसच्या अदिती पोहरे, महायुतीचे किरण सरनाईक शिवसेना ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने ही रिंगणात आहेत तर महायुतीच्या उमेदवारास विरोधात भारतीय जनता पक्षाचे संगीता शिंदे, शेखर भोयर, सुमित पवार हे तीन बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी देखील रिंगणात आहेत. ही निवडणूक पसंती क्रमांकाची असून बॅलेट पेपरवर पसंती क्रमांक लिहून मतदान करावं लागणार आहे…

  • 23 Oct 2026 07:32 AM (IST)

    औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

    सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत आज पार पडणार मतदान होईल. नांदेड जिल्ह्यात 120 मतदान केंद्र आहेत. 36 हजार 687 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी 120 केंद्राध्यक्ष, 630 मतदान अधिकारी आणि 55 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व पात्र पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्याच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहेत.

  • 23 Oct 2026 07:25 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 25 मतदान केंद्र

    अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 25 मतदान केंद्र असणार आहे. अमरावती शहरात 11 तर सर्व तालुक्याच्या ठिकाणी 14 असे एकूण 25 मतदार केंद्रावर शिक्षक मतदार करणार आहे. या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने चुरस वाढलेली आहे.अमरावती शहरात 11 तर सर्व तालुक्याच्या ठिकाणी 14 असे एकूण 25 मतदार केंद्रावर शिक्षक मतदार करणार आहे.

  • 23 Oct 2026 07:17 AM (IST)

    अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक आज सकाळी आठ वाजता पासून मतदानाला होणार सुरुवात

    अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकी करिता अमरावती ,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातील 35 हजार 810 शिक्षक मतदार या मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकूण 26 उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे. मतदान प्रक्रियेसाठी ३७७ अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावणार आहे. सर्व पाचही जिल्ह्यात 81 मतदान केंद्र आहेत .. सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार आहे.

  • 23 Oct 2026 07:12 AM (IST)

    अठरा वर्षांचा हिशोब द्या, मगच मतदान मागायला या- उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील

    पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. अठरा वर्षांचा हिशोब द्या, मगच मतदान मागायला या,” अशी भूमिका काही मतदारांनी मांडल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. मतदारसंघ मोठा असून पदवीधरांचे प्रश्न प्रलंबित आहेत. डॉक्टरी पेशा आणि शैक्षणिक संस्थांशी कुटुंबाचा संबंध असल्याने जनसंपर्कासाठी फायदा झाला. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे उमेदवार डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांचे आवाहन

  • 23 Oct 2026 07:09 AM (IST)

    पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान

    पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात एकूण 72 मतदान केंद्र उभारण्यात आलेत. शिक्षक निवडणुकीसाठी एकूण 61 हजार 940 मतदार आहेत. तर पदवीधरसाठी 3 लाख 88 हजार 19 मतदार आहेत. सोलापुरातील नुमवी शाळेमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आलेय.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर तर पुणे आणि अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. आज शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात होईल. तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. 182 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. दहा लाखांहून अधिक मतदार या निवडणुकीत त्यांचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघांत सर्वाधिक 3 लाख 88 हजार मतदार आहेत. सर्वात कमी 35 हजार मतदार हे अमरावती शिक्षक मतदारसंघात आहेत. या निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघात 2,419 मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींप्रकरणातील ऑडिओ बॉम्बने एकच खळबळ उडाली आहे. काल त्यांनी हा बॉम्ब टाकताच राजकारण ढवळून निघाले. महायुतीतील बेबनाव त्यातून समोर आलाच. पण राजकीय इभ्रतही टांगणीला लागली. या ऑडियो क्लिपची फॉरेन्सिक सत्यता तपासण्याची आणि आरोपांच्या चौकशीची मागणी आता शिंदे सेनेने केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठीच हा प्रकार करण्यात येत असल्याचा शिंदे सेनेचा आरोप आहे. काल शिंदे सेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याविषयीचा तपास आणि चौकशीची मागणी केली आहे. मंत्री उदय सामंत यांनी या ऑडियो क्लिपमधील व्यक्ती या भाजपशीसंबंधित असल्याचे वक्तव्य केले होते. आशिष शेलार यांनी या व्यक्तींचा भाजपशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. एकूणच या ऑडिओ क्लिपने राज्यातील राजकारण गढूळ झालेच नाही तर ढवळून निघाले आहे.

राज्यातील मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राला दुष्काळाचे भीषण चटके सहन करावे लागत आहे. चारा आणि पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामीण भागात आली आहे. तर रोजगारासाठी अनेक गावं ओस पडायला सुरूवात झाली आहे. काही गावात आता केवळ वृद्ध व्यक्ती राहत आहेत. कर्ती माणसं कुटुंब कबिल्यासह रोजगारासाठी स्थलांतर करत आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

Published On - Oct 23,2026 7:08 AM

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ