मुस्तफिजुर रहमान याचे कमबॅक? BCCI नं खरंच दिली IPL 2026 मध्ये खेळण्याची ऑफर? मोठी अपडेट काय?
Mustafizur Rahman Comeback in IPL 2026: क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठे नाट्य घडवलं. दरम्यान बांगलादेशातून एक मोठा दावा समोर येत आहे.

Mustafizur Rahman Comeback in IPL 2026: भारत आणि बांगलादेशात सत्तापालट नाट्यानंतर मोठा तणाव आहे. तर त्याचे पडसाद क्रिकेट जगतातही उमटले आहेत. BCCI ने बांगलादेशाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला आयपीएल 2026 मध्ये खेळण्यास मंजूरी दिली नाही. कोलकत्ता नाईट रायडर्सने आयपीएल 2026 साठी लिलावात या बांगलादेशी खेळाडूला 9.2 कोटी रुपयात खरेदी केले होते. पण बांगलादेशात हिंदूवर सुरु असलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे भारतात बांगलादेशी खेळाडूंविरोधात असंतोष आहे. त्यामुळे बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिजुर रहमानला सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नाटकं सुरू केली. सुरक्षेची कारणं पुढे करत टी20 विश्वचषकातील भारतामधील तीन सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता बांगलादेशातून एक दावा समोर येत आहे. त्यानुसार BCCI ने मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलमध्ये खेळण्यास मंजूरी दिली आहे. आता या सर्व घटनाक्रमावर BCB चे अध्यक्ष अमिनूल इस्लाम बुलबुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बुलबुल यांचे महत्त्वाचे वक्तव्य
अजकेर या वृत्तपत्रानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी मुस्तफिजुर याला पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याविषयी BCCI शी कोणतीही चर्चा झालेली नाही. बीसीसीआयकडून कोणतेही लिखित पत्र अथवा ई-मेल त्यांना प्राप्त झालेला नाही. तर बोर्डाअंतर्गतही याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. बांगलादेशातील याविषयीच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही.
बीसीसीआयने मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलमध्ये खेळण्याची कोणतीही ऑफर दिलेली नाही असे बुलबुल यांनी स्पष्ट केले. तर ताज्या माहितीनुसार, आयसीसीने बांगलादेशाची भारतातील त्यांच्या संघाचे सामने श्रीलंकेत खेळण्याची केलेली मागणी फेटाळण्यात आली आहे. बांगलादेशाने या विश्वचषकात खेळावे असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. तर आता बीसीबीने अजून एक पत्र आयसीसीला दुसरे पत्र लिहिले आहे. या पत्रातील तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र सुरक्षेची चिंता व्यक्त करत या सामन्यांमध्ये विशेष सुरक्षा देण्याची मागणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टी20 विश्वचषक 2026 चा रणसंग्राम 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन्ही या विश्वचषकाचे यजमान आहेत. बांगलादेशाचे सुरुवातीचे सर्व सामाने भारतातच होत आहेत. बांगलादेशाचे तीन सामने हे कोलकत्ता येथील ईडन गार्डन मैदानावर होत आहे. तर एक सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतात न खेळण्याचे नाटक सध्या बांगलादेश क्रिकेट बोर्ड करत आहे.
