AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं! शरद पवारांमुळे राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध? जाणून घ्या मतांचं गणित काय?

येत्या 16 मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने चार नावे जाहीर केले आहेत. शरद पवारही ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

ठरलं! शरद पवारांमुळे राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध? जाणून घ्या मतांचं गणित काय?
DEVENDRA FADNAVIS AND SHARAD PAWARImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 04, 2026 | 3:48 PM
Share

Rajya Sabha Election : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. येत्या 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील सात जागांसाठी एकूण 10 राज्यांतील 30 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सध्याचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून या निडणुकीसाठी राजकीय गणित जुळवण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या. दरम्यान, आता भाजपाने आपल्या चार उमेदवारांचे नाव जाहीर केले आहे. खासदार शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. हीच शक्यता लक्षात घेता आता राज्यातील सातही जागा बिनविरोध होण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विजयाचे आणि मतांचे गणित काय आहे? हे समजून घेऊ या…

भाजपाने जाहीर केली उमेदवारांची नावे

भाजपाने आपल्या चार उमेदवाराची नावे जाहीर केली आहेत. या यादीमध्ये माजी मंत्री विनोत तावडे, आरपीआय (आठवले गट) पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाचे हिंगोलीत नेते रामराव वडकुते, नागपूरच्या भाजपाच्या नेत्या माया इवनाते यांचे नाव आहे. प्रत्येक एक जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली आहे.

शरद पवार यांचे नाव निश्चित

दुसरीकडे महाविकास आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. या जागेसाठी शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. याआधी राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती.

बिनविरोध निवडणूक कशी होऊ शकते?

सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव जाहीर झाले तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपाची तयारी असल्याचे बोलले जात आहे. परंतु महाविकास आघाडीने ठाकरे गट किंवा काँग्रेस या पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपादेखील सातव्या जागेसाठी उमेदवार देऊ शकते, असे सांगितले जातेय. उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या सपंतीच्या 37 मतांची गरज आहे. महायुतीचे संख्याबळ 232 आहे. शिंदे गटाकडे 20 मते तर अजित पवार यांच्या पक्षाकडे तीन मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे ऐनवेळी मतांची जुळवाजुळव करून भाजपा सातव्या जागेसाठी ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता सातव्या जागेसाठी शरद पवार यांचेच नाव निश्चित झाल्याने सातवी जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Follow Us
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.