AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला, मुंबईला झटका, रोहित आऊट, कुणाला संधी? पाहा प्लेइंग 11

Mumbai Indians vs Punjab Kings Toss and Playing 11: मुंबई इंडियन्सचा 19 व्या मोसमातील वानखेडे स्टेडियममधील एकूण तिसरा सामना आहे. मुंबईने याआधी वानखेडे स्टेडियममध्ये 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर एकदा मुंबईला पराभूत व्हावं लागलंय.

MI vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला, मुंबईला झटका, रोहित आऊट, कुणाला संधी? पाहा प्लेइंग 11
Rohit Sharma MI IPLImage Credit source: PTI
| Updated on: Apr 16, 2026 | 8:11 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्सचं आव्हान आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील पाचवा सामना आहे. पंजाबने आतापर्यंत 4 पैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर पंजाबचा 1 सामना पावसाने वाया घालवला. तर मुंबईने विजयी सुरुवातीनंतर सलग 3 सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईसमोर पंजाबला पराभूत करुन कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे मुंबईचा चांगलाच कस लागणार आहे. मुंबई-पंजाब सामन्याला वानखेडे स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस झाला. पंजाबने टॉस जिंकला. कर्णधार श्रेयस अय्यर याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबची या मोसमात पहिल्या डावात बॉलिंग करण्याची सलग पाचवी वेळ ठरली आहे. त्यामुळे पंजाबचे गोलंदाज होम टीम मुंबईला किती धावांवर रोखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईत 2026 पासून आतापर्यंत एकूण 10 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. या 10 पैकी 6 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. तर 4 सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

मुंबई-पंजाब 2023 नंतर वानखेडेत आमनेसामने

मुंबई विरुद्ध पंजाब दोन्ही संघ या सामन्यानिमित्ताने वानखेडे स्टेडियममध्ये 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांत याआधी वानखेडे स्टेडियममध्ये 2023 साली एकमेकांविरुद्ध खेळले होते.

श्रेयसची कर्णधार म्हणून कामगिरी

श्रेयस अय्यर याला आयपीएल स्पर्धेत नेतृत्व करण्याचा तगडा अनुभव आहे. श्रेयसने आतापर्यंत 91 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे.श्रेयसने त्यापैकी 53 सामन्यांमध्ये आपल्या संघाला विजयी केलं आहे. तर श्रेयसच्या नेतृत्वात 35 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रेयसची कर्णधार म्हणून विजयी टक्केवारी ही 60 इतकी आहे.

प्लेइंग ईलेव्हन अपडेट

पंजाब किंग्सने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर मुंबईने एकूण 3 बदल केले आहेत. रोहित शर्मा याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. त्याशिवाय मिचेल सँटरन आणि क्विंटन ट्रेंट बोल्ट यांनाही बाहेर व्हावं लागलंय. तर या तिघांच्या जागी क्विंटन डी कॉक, मयंक रावत आणि दीपक चाहर यांचा समावेश करण्यात आलं आहे. मयंकचं आयपीएल पदार्पण झालं आहे.

मुंबइ इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मयंक रावत, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.

पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कॅप्टन), कूपर कोनोली, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार व्यास, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी