AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत

Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत

| Updated on: Oct 19, 2026 | 5:24 PM
Share

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलने जोरदार आघाडी घेतली आहे. महायुतीचे तिन्ही माजी चेअरमन पराभूत झाले असून, सतेज पाटील सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, पराभूत उमेदवार शौमिका महाडिक यांच्या मागणीनंतर फेर मतमोजणी सुरू झाली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असताना सतेज पाटील यांच्या पॅनलने निवडणुकीत जोरदार आघाडी घेतली आहे. सतेज पाटील यांच्या पॅनलने १४ जागांवर आघाडी घेतली असून, महायुतीचे पॅनल ११ जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला असून, त्यांचे तिन्ही माजी चेअरमन अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ आणि विश्वास पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे.

कोल्हापुरातील सतेज पाटील यांच्या कार्यालयाबाहेर सध्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. फटाके फोडून आणि गुलाल उधळून कार्यकर्ते विजयाचा आनंद साजरा करत आहेत. गोकुळमध्ये सत्ता स्थापनेच्या दिशेने सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीची वाटचाल सुरू असून, आता केवळ विजयाची औपचारिकता बाकी आहे.

दरम्यान, या निवडणुकीत शौमिका महाडिक यांचा पराभव झाला आहे. त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर मतमोजणी पुन्हा सुरू झाली आहे आणि ती थोड्याच वेळात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

Published on: Oct 19, 2026 05:24 PM

Follow Us