AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

| Updated on: Oct 19, 2026 | 4:49 PM
Share

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांचे पॅनल १४ जागांवर आघाडीवर असून, महायुती ११ जागांवर आहे. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. विजयाची केवळ औपचारिकता बाकी असून, सतेज पाटील यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने निर्णायक आघाडी घेतली असून, त्यांनी १४ जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुतीला ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या विजयानंतर कोल्हापुरातील सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला.

विजयाची केवळ औपचारिकता बाकी असून, थोड्याच वेळात सतेज पाटील स्वतः कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. ही निवडणूक सतेज पाटील आणि महायुती यांच्यात थेट झाल्याने राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. सतेज पाटील यांच्या पॅनलला मिळालेल्या या यशामुळे गोकुळमध्ये सत्ता स्थापनेचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, हा विजय सतेज पाटील यांच्या राजकीय ताकदीचे प्रतीक मानला जात आहे.

Published on: Oct 19, 2026 04:49 PM

Follow Us