15 एप्रिल 2026
Created By: संजय पाटील
आरसीबीसाठी कृणाल पंड्या याने बुधवारी 15 एप्रिलला लखनौ विरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 38 रन्स देऊन 2 विकेट्स मिळवल्या.
कृणालने लखनौ सुपर जायंट्सच्या मिचेल मार्श आणि अब्दुल समद या प्रमुख फलंदाजाना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
कृणालने या 2 विकेट्ससह ऐतिहासिक कामगिरी केली. कृणालने नक्की केलंय हे जाणून घेऊयात.
अब्दुल समदला आऊट करत कृणालने आयपीएलमधील 100 वी विकेट पूर्ण केली. कृणालने 147 व्या सामन्यांत ही कामगिरी केली.
कृणाल यासह 100 विकेट्स घेणारा सहावा फिंगर स्पिनर ठरला. त्याआधी सुनील नारायण, आर अश्विन, रवींद्र जडेजा, हरभजन सिंह आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंनी विकेट्सचं शतक पूर्ण केलंय.
कृणालने 2016 साली मुंबईकडून आयपीएल पदार्पण केलं होतं. त्यानंतर कृणाल लखनौकडून खेळला. तर आता कृणाल आरसीबीचं प्रतिनिधित्व करतोय.
दरम्यान कृणालने आतापर्यंत 19 व्या मोसमातील (IPL 2026) 5 सामन्यांमध्ये 7 विकेट्स मिळवल्या आहेत.