AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोला कसे तोंड दाखवू ?, गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त व्यक्तीने स्वत:चे डोके फोडून घेतले

गॅस सिलिंडर मिळत नसल्याने सामान्य नागरिकांना प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागले आहे.छत्रपती संभाजीनगरात रांगा लावूनही सिलिंडर मिळत नसल्याने एका व्यक्तीने स्वत:चे डोके फोडून घेतल्याची घटना घडली आहे.

बायकोला कसे तोंड दाखवू ?, गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त व्यक्तीने स्वत:चे डोके फोडून घेतले
lpg shortage
| Updated on: Apr 16, 2026 | 4:59 PM
Share

गॅस सिलिंडरची कोणतीही टंचाई नसल्याचे सरकार कानी कपाळी ओरडून सांगत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरात अनेकदा रांगा लावूनही गॅस सिलिंडर मिळत नसल्याने एका संपप्त व्यक्तीने स्वत:चे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सरकारच्या दावे किती पोकळ आहेत हे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या ग्रामीण भागात लोकांना अनेकदा प्रयत्न करुनही गॅस सिलिंडर मिळत नसल्याचे दु:खद चित्र आहे.

इराण युद्धाने इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने लोकांना गॅस सिलिंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेपू येथे गॅस सिलेंडर न मिळाल्याने एका व्यक्तीचा संताप अनावर झाला. या व्यक्तीने कमल गॅस एजन्सीसमोरच स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

बालचंद नेमाने गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चकरा मारीत होते. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्याने ते संतप्त झाले. “घरी बायकोला तोंड कसे दाखवू ?” असे म्हणते ते अशा रक्तबंबाळ अवस्थेतही स्वत:च्या तोंडाला चापट्या मारीत होते. या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीस उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गॅस टंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जळगाव जामनेर येथे सिलिंडर आडवे टाकून रास्ता रोको

जळगावच्या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात घरगुती सिलिंडरसाठी नागरिकांनी ‘रास्ता रोको’ केल्याची घटना घडली आहे. संतप्त ग्राहकांनी रिकामे सिलिंडर रस्त्यावर आडवे टाकून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. घरगुती गॅस सिलेंडरसाठी महिनाभर प्रतिक्षा, एजन्सीकडे वारंवार फेऱ्या मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. पहाटे चार ते पाच वाजल्यापासून ग्राहक सिलिंडरसाठी रांगेत उभे राहूनही त्यांना सिलेंडर न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे काही नागरिकांनी रिकामे सिलिंडर रस्त्यावर आडवे टाकून वाहतूक बंद केली. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला.

नागपूर जिल्ह्यातील काही भागात अजूनही गॅस सिलिंडरसाठी लोकांची रांगा कायम आहेत. घरपोच गॅस सिलिंडर मिळत नसल्याने लोक सकाळपासून गॅस सिलिंडरच्या गोडाऊन बाहेर उभे असतात. जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच सिलिंडर वितरणाच्या सूचना दिल्या असतानाही काही भागात गॅस सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे. ॲानलाईन नंबर लावूनही ग्राहकांना गॅस सिलेंडर घरपोच मिळत नाही. त्यामुळे गॅस सिलिंडरसाठी लोकांना भर उन्हात गोडाऊन बाहेर रांगेत उभे रहावे लागत आहे.

घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरणारी टोळी जेरबंद

बेसा पिपळा परिसरात घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या एका टोळीवर अन्न वितरण विभागाने कारवाई केली आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने गॅस चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती.या टोळीकडून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात दोन जणांना अन्न वितरण विभागाने पोलीसांच्या स्वाधिन केले आहे. या टोळीतील मोठा मासा कोण? याचा शोध सुरु आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...