MI vs PBKS Live Score Updates, IPL 2026: सलग 2 झटक्यानंतर नमन धीर-डी कॉकने मुंबईला सावरलं
Mumbai Indians vs Punjab Kings Indian Premier League 2026 Live Score Updates: पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केलीय. पंजाब आपल्या मोहिमेतील पाचवा सामना यजमान मुंबई विरुद्ध खेळत आहे. हा सामना मुंबईसाठी फार आव्हानात्मक आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
MI vs PBKS Live Score Updates : सलग 2 झटक्यानंतर नमन धीर-डी कॉकने मुंबईला सावरलं
अर्शदीप सिंह याने मुंबई इंडियन्सला 2 बॉलवर 2 झटके दिले. त्यामुळे मुंबई बॅकफुटवर गेली. मात्र नमन धीर आणि क्विंटन डी कॉक या जोडीने मुंबईचा डाव सावरला आहे. या दोघांनी विकेट न गमावता मुंबईला 6 ओव्हरमध्ये 48 रन्सपर्यंत पोहचवलं.
-
MI vs PBKS Live Score Updates : अर्शदीपची कमाल, सलग 2 झटके, मुंबई बॅकफुटवर
मुंबई इंडियन्सला संयमी सुरुवातीनंतर सलग 2 झटके लागले आहेत. अर्शदीप सिंह याने मुंबईला 2 बॉलमध्ये 2 झटके दिले आहेत. अर्शदीपने रायन रिकेल्टन याच्यानंतर सूर्यकुमार यादव याला आऊट केलंं. रायनने 2 धावा केल्या. तर अर्शदीपने सूर्याला पहिल्याच बॉलवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
-
-
MI vs PBKS Live Score Updates : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, क्विंटन-रायन मैदानात
मुंबई विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला सुरुवात झाली आहे. पंजाबने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
MI vs PBKS Live Updates : पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कॅप्टन), कूपर कोनोली, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार व्यास, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
-
MI vs PBKS Live Updates : मुंबइ इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबइ इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मयंक रावत, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.
-
-
MI vs PBKS Live Updates : पंजाबने टॉस जिंकला, मुंबई विरुद्ध बॉलिंगचा निर्णय
मुंबई विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. रोहित शर्मा याला दुखापतीमुळे पंजाब विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे.
-
MI vs PBKS Live Updates : थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. त्यामुळे नाणेफीचा कौल कुणाच्या बाजून लागणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
-
MI vs PBKS Live Updates : हेड टु हेड रेकॉर्ड्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आतापर्यंत टफ फाईट पाहायला मिळाली आहे. उभयसंघात एकूण 34 सामने खेळवण्यात आले आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 17-17 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता मुंबई आणि पंजाबपैकी कोणता संघ विजय मिळवून आघाडी घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
MI vs PBKS Live Updates : पंजाब किंग्स टीम
प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन) प्रियांश आर्य, कूपर कोनोली, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, झेव्हीयर बार्टलेट, विजयकुमार विशक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विष्णू विनोद, सुर्यांश शेडगे, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार, मिशेल ओवेन, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश, विशाल निषाद, अजमतुल्ला उमरझाई, लॉकी फर्ग्युसन, प्रवीण दुबे आणि बेन द्वारशुईस.
-
MI vs PBKS Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
रायन रिकेल्टन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह, कॉर्बिन बॉश, अश्वनी कुमार, रघु शर्मा, राज बावा, दीपक चहर, क्विंटन डी कॉक, विल जॅक्स, मयंक रावत, कृष भगत, रॉबिन मिंझ, अल्लाह गझनफर, दानिश मलेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.
-
MI vs PBKS Live Updates : मुंबई विरुद्ध पंजाब आमनासामना, कोण जिंकणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील पाचवा सामना आहे. मुंबईने विजयी सुरुवातीनंतर सलग 3 सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईसमोर विजय मिळवण्याचं आव्हान आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 24 वा सामना होत आहे. जोन्ही संघांचा हा एकूण पाचवा सामना आहे. मुंबईने 4 पैकी 3 सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईसाठी पंजाब विरुद्धचा सामना फार महत्त्वाचा आहे. मात्र मुंबईसमोर अजिंक्य असलेल्या पंजाबचं कडवं आव्हान असणार आहे. पंजाबने या मोसमात 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई वानखेडे स्टेडियममध्ये कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Published On - Apr 16,2026 6:12 PM
