Vaibhav Sooryavashi: वैभवला न्यूझीलंडविरुद्ध तरी संधी मिळणार की नाही? अखेर वैतागून कॅप्टन श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितले…
Shreyas Iyer On Vaibhav Sooryavanshi: भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही हे स्पष्टपणे बोलून दाखवले आहे,

IND vs NZ T20 Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. या मालिकेपूर्वी आता श्रेयस अय्यरने एका पत्रकार परिषदेत भाग घेतला. या पत्रकार परिषदेत त्याने अनेक मुद्यांवर आपले मत मांडले. न्यूझीलंडसाठी भारतीय संघाची कशी रणनीती असणार आहे ही पण त्याने बोलून दाखवली. तर त्याने वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही हे पण बोलून दाखवले आहे.
सामन्यापूर्वी, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टपणे सांगितले की, “वैभव सूर्यवंशीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.” वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांमध्ये त्याला यापूर्वी संधी देण्यात आली नव्हती. कर्णधार अय्यरने सांगितले की, “अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीवीर म्हणून सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत, त्यामुळे सध्या संघात वैभवला स्थान नाही.”
पहिल्या सामन्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना, कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितले की, “वैभव निःसंशयपणे एक उत्तम प्रतिभावान खेळाडू आहे, परंतु सध्याचे दोन्ही भारतीय सलामीवीर, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन, सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत, सॅमसनने दोन अर्धशतके, तर अभिषेकने एक अर्धशतक झळकावले. जोपर्यंत वैभवला संधी मिळत नाही, तोपर्यंत त्याला आनंदी ठेवणे आणि त्याचे मनोधैर्य टिकवून ठेवणे ही इतर खेळाडूंची जबाबदारी आहे.”
कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “तो अजून खूप लहान आहे, आणि त्याला संधी मिळायला अजून बरीच वर्षे आहेत. आमचे सलामीवीर सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांनी नुकतेच विश्वचषक जिंकले आहेत. वैभव सूर्यवंशी केवळ ड्रेसिंग रूममध्ये राहूनच बऱ्याच गोष्टी शिकत आहे. य वैभव टीम इंडियासोबत परदेशात दौरे करत आहे आणि पुढच्या वेळी येथे आल्यावर खेळपट्ट्या कशा असतील याची त्याला चांगली कल्पना असेल.” वैभवला आशियाई क्रीडा स्पर्धेत संधी मिळाली होती तेव्हा सर्वांना वाटलं की आता वैभव सातत्याने खेळताना पाहायला मिळेल पण तसे काही झाले नाही.
