Sanjay Raut On Chakankar | चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “रुपाली चाकणकर या मूर्ख आहेत आणि खोटं बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्यांच्या पदावर त्या एक मिनिटही राहू नयेत, जर त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत कॅप्टन अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “रुपाली चाकणकर या मूर्ख आहेत आणि खोटं बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्यांच्या पदावर त्या एक मिनिटही राहू नयेत, जर त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.”
याशिवाय, “हा वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न कसा होऊ शकतो?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात अनेक बाबी गेल्या काही काळापासून चर्चेत असल्याचे राऊत यांनी सांगितले. नाशिकमध्ये एका महिलेने त्रस्त होऊन तक्रार केल्याचा उल्लेख करत, बंद दरवाजाआड महिलांवर अत्याचार होत असल्याच्या चर्चा असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच, काही प्रकरणांमध्ये दबाव टाकून तक्रारी दाखल होऊ नयेत यासाठी प्रयत्न झाल्याचेही आरोप राऊत यांनी केले.
Published on: Mar 19, 2026 12:05 PM
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...

