AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Rekha Konde Attack News: पुण्यात तुफान राडा! ठाकरे गटाच्या रेखा कोंडेंना मारहाण, नेमकं काय घडलं?

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी तुफान राडा झाला असून ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांना मारहाण करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ ,पुणे शहर अध्यक्षा आरती मारणे यांच्याकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप रेखा कोंडे यांनी केला आहे.

Pune Rekha Konde Attack News: पुण्यात तुफान राडा! ठाकरे गटाच्या रेखा कोंडेंना मारहाण, नेमकं काय घडलं?
| Updated on: Nov 20, 2026 | 9:21 PM
Share

लक्ष्मण जाधव,प्रतिनिधी:  पुण्यामधून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी तुफान राडा झाला असून ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांना मारहाण करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ ,पुणे शहर अध्यक्षा आरती मारणे यांच्याकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप रेखा कोंडे यांनी केला आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

नेमकं काय घडलं? 

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी शहर अध्यक्षा तथा अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा कोंडे यांना मारहाण करण्यात आल्याचं समोर आले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहर अध्यक्षा आरती मारणे- पवार यांच्याकडून ही मारहाण करण्यात आली आहे.

काय म्हणाल्या आरती मारणे?

“रेखा कोंडे हिने आक्षेपार्ह व्हिडिओ तसेच माझी बदनामी केल्यामुळे आमचा राग अनावर झाला. आम्ही काही रस्त्यावरती पडलो नाहीत, माझे चार लग्न झाले आहेत असं ती म्हणते. जरांगे पाटील यांच्यावरही बोलत असते. सुषमा अंधारे यांना माझी विनंती आहे की रेखा कोंडेला पक्षातून काढून टाका, तसेच मराठा महासंघातूनही काढून टाका,” असं आरती मारणे यांनी म्हटलं आहे.

तसेच “आमच्याबद्दल ती घाण घाण बोलत आहे. माझ्या दोन मुली आहेत त्यांना काय वाटेल? मी कधी रेखा कोंडेंविषयी काहीही वाईट बोलले नाही. मी मराठ्यांची वाघीण आहे म्हणुन आरोपाला उत्तर दिले, मी अन्याय सहन करणारी नाही. रेखा कोंडे सतत पक्ष बदलत असतात. तिला कोणी घेत नाही तरी तीची गाडीत बसायची तयारी असते,” अशी टीकाही आरती मारणे यांनी केली आहे.

दरम्यान, “मराठा महासंघाची आरती माने नावाची नावाची महिला माझ्यावर जळते, तिने मला मारहाण केली. मी तिची कुठलीही बदनामी केली आहे. माझे पती नसताना या महिलेने माझ्यावर खोटे आरोप केले. मी सामाजिक क्षेत्रात एकटी काम करते, महिलांसाठी लढते. तिला माझे काम बघवत नाही,” असा आरोप रेखा कोंडे यांनी केला आहे.

Follow Us
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर