AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तांदूळ भेसळीवरून इगतपुरीत खळबळ; झिरवाळांशी संवादाचा प्रयत्न, मोबाईलवरूनही वाद, नेमकं काय घडलं?

इगतपुरी तालुक्यातील तांदूळ भेसळीच्या आरोपांवरून भूमिपुत्र फाउंडेशनचे विनोद नाठे आक्रमक झाले आहेत. परराज्यातून तांदूळ आणून घोटीत भेसळ केली जात असून इगतपुरी-घोटी-त्र्यंबकेश्वरच्या नावाने हा तांदूळ देशभर विकला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तांदूळ भेसळीवरून इगतपुरीत खळबळ; झिरवाळांशी संवादाचा प्रयत्न, मोबाईलवरूनही वाद, नेमकं काय घडलं?
vinod nathe alleges rice adulteration in ghoti igatpuriImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 29, 2026 | 11:17 PM
Share

इगतपुरी तालुक्यातील तांदूळ भेसळीच्या आरोपांवरून भूमिपुत्र फाउंडेशनचे विनोद नाठे आक्रमक झाले आहेत. परराज्यातून तांदूळ आणून घोटीत भेसळ केली जात असून इगतपुरी-घोटी-त्र्यंबकेश्वरच्या नावाने हा तांदूळ देशभर विकला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे तालुक्याची बदनामी होत असल्याचे सांगत नाठे यांनी चौकशीची मागणी केली आहे. याबाबत नाशिक जिल्हा परिषद CEO ओंकार पवार आणि नरहरी झिरवाळ यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यातील तांदूळ भेसळीच्या आरोपावरून विनोद नाठे आक्रमक झाले आहेत. परराज्यातून तांदूळ आणून घोटीत भेसळ केली जात असल्याचा नाठे यांचा आरोप आहे. इगतपुरी-घोटी-त्र्यंबकेश्वरच्या नावाने भेसळयुक्त तांदूळ देशभर विकला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तांदूळ भेसळीमुळे इगतपुरी तालुक्याची बदनामी होत असल्याचा नाठे यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना तांदळाला योग्य भाव मिळत नसताना भेसळयुक्त तांदूळ तालुक्याच्या नावाने विकला जात असल्याचा दावा केला आहे.

नाशिक जिल्हा परिषद CEO ओंकार पवार यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह चौकशीच्या मागणीसाठी गेले होते नाठे. यावेळी त्यांनी नरहरी झिरवाळ यांची बैठक सुरू असल्याने कार्यालयाबाहेर थांबल्याची नाठे यांनी माहिती दिली. बैठक संपल्यानंतर झिरवाळ यांच्याशी तांदूळ भेसळीच्या मुद्द्यावर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. संवादाचे रेकॉर्डिंग करण्यासाठी मोबाईल शेतकऱ्याच्या हातात दिल्याचा नाठे यांचा दावा आहे. दरम्यान, झिरवाळ यांच्या स्वीय सहाय्यकाने मोबाईल बंद करून घेतल्याचा नाठे यांचा आरोप आहे.

‘परवानगी घेतली का?’ असा सवाल करत मोबाईल हिसकावल्याचा आरोप

यानंतर नाठे यांनी स्वतः सेल्फी व्हिडिओ करत झिरवाळ यांना तांदूळ भेसळीबाबत सवाल केले.  झिरवाळ यांनी प्रश्नावर उत्तर न देता तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचा नाठे यांचा दावा आहे. पण वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा नाठे यांचा आरोप. स्थानिक भुरटे नेत्यांच्या भेटींमुळे कारवाई होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तांदूळ भेसळीच्या आरोपांची संबंधित यंत्रणेकडून चौकशी करण्याची नाठे यांची मागणी घोटीतील तांदूळ भेसळीच्या प्रकरणात तुकाराम मुंडे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केल्याने तांदूळ भेसळीच्या आरोपांवर प्रशासन काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप