AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये उभारणार महाराष्ट्र भवन, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी घेतील बिहारच्या मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र भवन बांधण्याबाबत आज बिहारमध्ये महत्वाची बैठक झाली असून त्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार करणार असून जागा देण्याचे आश्वासन बिहाराचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दिले आहे.

बिहारमध्ये उभारणार महाराष्ट्र भवन, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी घेतील बिहारच्या मुख्यमंत्र्यांची भेट
sanjay shirsat
| Updated on: Nov 20, 2026 | 8:06 PM
Share

महाराष्ट्रात अधूनमधून हिंदी आणि मराठी भाषिक वादाची भरती ओहोटी सुरु असते. त्याच देशातील इतर राज्यांना नवीमुंबईत त्याचे आसाम, बिहार भवन बांधण्यासाठी सढळहस्ते जमिनी मंजूर केल्या जात असतात. यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सतत टीका करत असतात. अशात आता बिहारमध्ये आता महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याचे वचन बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दिले आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची पाटणा येथे भेट घेतली आहे. त्यावेळी बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला.बिहारमध्यील बुद्धगया या ठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी जलद गतीने दहा एकर जमिनीवर महाराष्ट्र भवन इमारत उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दिले आहे.

बिहारमधील बौद्धगया येथे महाराष्ट्र भवनासाठी 8 ते 10 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अशा मागणीचे पत्र सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना दिले आहे. या महाराष्ट्र भवनाचा बांधण्याचा खर्च महाराष्ट्र शासनाकडून केला जाणार आहे. महाराष्ट्रातून बोधगयाला येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी निवास, भोजन आणि सांस्कृतिक सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाला बिहार सरकारशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बिहारमधील बोधगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना पत्र लिहिले आहे. बोधगया हे भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाल्याचे पवित्र स्थळ असून, या ठिकाणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध चळवळीशी असलेले नाते लक्षात घेता, दरवर्षी महाराष्ट्रातून हजारो भाविक, पर्यटक आणि अभ्यासक बोधगयाला भेट देत असतात. या भाविकांसाठी निवास, भोजन, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र भवन उभारण्याचा प्रस्ताव पत्रात मांडण्यात आला आहे.

राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत होण्यास मदत

यासाठी बोधगया येथे 8 ते 10 एकर योग्य जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र भवनाच्या बांधकामाचा, विकासाचा आणि देखभालीचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन करणार असल्याचे संजय शिरसाट यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकल्पामुळे बिहार आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढण्यास आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकल्पासंदर्भात बिहार सरकारशी संपर्क साधण्याचे निर्देश महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाला देण्यात आले आहेत.

Follow Us
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?