केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून… चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
केतन अग्रवाल प्रकरणाच्या चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी रितेश हंगे याने सोशल मीडिया आणि गुगलचा वापर करून कट रचला होता. लोहगडावर केतनला दरीत ढकलून देण्याचा कट होता. सोनम केसचा अभ्यास, आयफोन कॉल हिस्ट्री डिलीट करण्याचे सर्च केले होते. नियोजनबद्ध रीतीने ही घडवून आणल्याचे चार्जशीटमध्ये नमूद आहे.
केतन अग्रवाल प्रकरणाच्या चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा कट सोशल मीडिया आणि गुगलच्या माध्यमातून आखण्यात आला होता. आरोपी रितेश हंगे याने संपूर्ण कटाची आखणी केली होती. घटना घडवून आणण्यासाठी सोनम केसचा अभ्यास करण्यात आला, तसेच आयफोनमधील कॉल हिस्ट्री कशी डिलीट करावी याचा शोध घेण्यात आला.
लोहगड आणि ट्रेकिंग अपघाताची माहिती, तसेच डेथ कॅप मशरूम इंडिया याबद्दलही गुगलवर सर्च करण्यात आले होते. चार्जशीटनुसार, सांगवीमधील मानसी गोविंदपुरकर यांच्या लोहगडावरील माहिती मिळाल्यानंतर, केतनला लोहगडावरून दरीत ढकलून देण्याचा कट रचण्यात आला. २९ मे रोजी लोहगडाची रेकी करण्यात आली. त्यानंतर ३१ मे रोजी सियाने केतनला लोहगडावर नेऊन घटनास्थळाचे फोटो काढून चेतन चौधरीला दाखवले आणि जागा निश्चित केली. केतनला दरीत कसे ढकलायचे याचा लुल्लानगर परिसरात सरावही करण्यात आला. घटनेनंतर पोलीस आणि नागरिकांशी काय बोलायचे याचेही नियोजन केले होते. ठरल्याप्रमाणे चेतनने केतनला पाठीमागून धक्का दिला आणि सियाने पायावर लाथ मारून त्याला दरीत ढकलले. हे सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाहिले आहे. संपूर्ण कट रितेश हंगेनेच रचला होता.
Published on: Sep 29, 2026 04:35 PM
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा

