AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup Semi Final: टीम इंडियावर चंद्रग्रहणाचा प्रभाव? सराव उशिराने सुरू केल्याने चर्चा

India vs England Semifinal: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने धडक मारली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच्या सरावावर चंद्रग्रहणाचा प्रभाव पडल्याची चर्चा रंगली आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

T20 World Cup Semi Final: टीम इंडियावर चंद्रग्रहणाचा प्रभाव? सराव उशिराने सुरू केल्याने चर्चा
T20 World Cup Semi Final: टीम इंडियावर चंद्रग्रहणाचा प्रभाव? सराव उशिराने सुरू केल्याने चर्चाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 03, 2026 | 9:34 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. यासाठी दोन्ही संघ मुंबईत दाखल झाले आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी सराव सुरू केला आहे. मुंबईत दाखल होण्यापूर्वी भारतीय संघ कोलकात्यात होता. वेस्ट इंडिजविरूद्धचा सामना संपल्यानंतर भारतीय संघ 2 मार्चला मुंबईत दाखल झाला. तसेच 3 मार्चपासून सराव सुरू करणार होते. पण चंद्रग्रहणामुळे या सरावावर प्रभाव पडल्याची चर्चा रंगली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारताचा सराव फ्लडलाइड प्रकाशात संध्याकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान निश्चित केला होता. पण भारतीय खेळाडू मैदानात उशिराने दाखल झाले. 7 वाजून 20 मिनिटं झाल्यानंतर भारतीय खेळाडू मैदानात सरावासाठी उतरले. इतकंच काय तर स्टेडियममधील लाईट 6 वाजून 50 मिनिटांपर्यंत बंद होत्या. त्यानंतर त्या सुरू करण्यात आल्या.

चंद्रग्रहणादरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने वैदिक नियम पाळल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. भारतीय खेळाडू सरावासाठी हॉटेलमधून स्टेडियमवर पोहोचले होते. फक्त हार्दिक पांड्या एकमेव असा खेळाडू होता की बसऐवजी स्वत:च्या गाडीतून मैदानात आला. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या आधीच मैदानात पोहोचले होते. पण त्यांच्या आगमनानंतरही सराव काही वेळेत सुरू झाला नाही. चंद्रग्रहणामुळे सरावाची वेळ लांबवली अशी चर्चा आता क्रीडावर्तुळात रंगली आहे. कारण चंद्रग्रहणाची वेळ 3 तास 27 मिनिटांची होती. दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू झालं आणि 6 वाजून 47 मिनिटांनी संपलं. त्यानंतरच सरावाला सुरूवात झाली.

भारत विरुद्ध इंग्लंड सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे. वानखेडे मैदानावर हा सामना असल्याने मोठी धावसंख्या होईल अशी चर्चा आहे. कारण हे मैदान तुलनेनं छोटं आहे आणि खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडेल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा वानखेडेवरील दुसरा सामना आहे. यापूर्वी अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खेळीमुळे विजय मिळवणं सोपं झालं होतं. तर इतर खेळाडूंनी नांगी टाकली होती. अभिषेक शर्माला तर खातंही खोलता आलं नव्हतं. तर इंग्लंडचा या मैदानावर तिसरा सामना आहे. दोन पैकी एका सामन्यात थोडक्यात विजय मिळाला. तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?