AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

CJP Protest Delhi on Pm Narendra Modi : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्थी आक्रमक झाले. त्यामध्येच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली.

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..
Narendra Modi
| Updated on: Jul 23, 2026 | 10:34 AM
Share

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीत मोठे आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे. संसदेवर मोठा मोर्चा काढण्यात आला. ज्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांवरही हल्ले केले जात आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत. देशभरातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. संसद परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. हेच नाही तर विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याही राजीनाम्याची मागणी केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच सरकारकडून याबाबत काही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात होता. यादरम्यानच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नीट पेपरफुटी प्रकरणी दोषींना लवकरच शिक्षा होईल. फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. नरेंद्र मोदी यांनी सीजेपी बाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

आपल्या तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य यापेक्षा अधिक काही महत्त्वाचे नाही. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या सर्व प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा केली जाईल. खटल्यांचा जलद निकालसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची तरतूद केली जाईल. संबंधित विभागाने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले.

विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला. तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात ही अत्यंत मोठी घोषणा केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. अखेर सरकारकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. थेट नरेंद्र मोदी यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

Follow Us
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका