AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफूची शेती करता येते? कसे आणि कुठे मिळते लायसन्स? जाणून घ्या ए टू झेड माहिती

Opium Farming : राज्यात अनेक ठिकाणी शेतात अफू लागवड केल्याप्रकरणात अनेक शेतकऱ्यांवर कारवाई होते. त्यांना अटक करण्यात येते. मोठा दंड ठोठावण्यात येतो. मग शेतकऱ्यांना अफूची शेती करता येते का? जाणून घ्या ए टू झेड माहिती

अफूची शेती करता येते? कसे आणि कुठे मिळते लायसन्स? जाणून घ्या ए टू झेड माहिती
अफूची शेती करता येते? कसे आणि कुठे मिळते लायसन्स?
| Updated on: Oct 28, 2026 | 12:49 PM
Share

Afu Sheti: अफूची चोरून लागवड केल्याप्रकरणात पोलीस धडक कारवाई करतात. राज्यात कुठे ना कुठे अशी कारवाई होतेच. शेतकरी त्यात भरडल्या जातो. त्याच्यावर अंमली पदार्थ कायद्यातंर्गत मोठी कारवाई करण्यात येते. मग शेतकऱ्यांना अफूची शेती करता येते का? त्यासाठी परवाना काढावा लागतो का? त्यासाठी परवाना कुठे काढता येतो? कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो असा परवाना? जाणून घ्या ए टू झेड माहिती

देशात अफूची शेती कोणीही करू शकत नाही. त्यासाठी एक प्रक्रिया आहे. शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदरच सरकारकडून लायसन्स, परवाना काढणे आवश्यक आहे. कोणत्या शेतकऱ्यांना अफू शेती करण्यासाठीचा परवाना मिळतो? आणि कुणाला हा परवाना मिळत नाही? केंद्र सरकारने 2026-27 साठी अफूची शेती करण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. यावेळी अफूची शेती करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. त्यासाठी काही अटी आणि शर्तींचे पालन करावे लागते. याविषयीचे नियम काय आहेत आणि शेतकरी परवान्यासाठी कसा करावा लागतो अर्ज? ही माहिती जाणून घेऊयात.

अफूची शेती करण्यासाठी कोण देतो परवाना?

देशात अफूच्या शेतीवर केंद्रीय अंमली पदार्थ ब्युरोचे (CBN) लक्ष असते. हे खाते अर्थ खात्यातंर्गत काम करते. सरकार एका निश्चित ठिकाणीच अफूची शेती करण्याची परवानगी देते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठराविक भागातच याची शेती होते. पण जो शेतकरी अफूची शेती करू इच्छितो, त्याला अटी आणि शर्तीचे पालन केल्यास परवाना देण्यात येतो.

नवीन नियमात काय बदल?

केंद्र सरकारने 24 ऑक्टोबर 2026 रोजी अफू शेतीचे नियम जाहीर केले. त्यानुसार, अफूचे दूध काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी परवाना नियमात बदल करण्यात आला आहे. वर्ष 2026-27 साठी परवाना मिळवणाऱ्या शेतकऱ्यांनी मागील हंगामात प्रति हेक्टर किमान 4.4 किलो मार्फिनच्या समतुल्य उत्पादन सरकारकडे जमा करणे आवश्यक आहे. यापूर्वी ही मर्यादा 4.2 किलो इतकी होती. पुढील हंगामासाठी हे उद्दिष्ट 5.9 किलो आहे.

अफू शेतीसाठी कुठे कराल अर्ज?

शेतकऱ्यांना अंमली पदार्थ ब्युरोच्या अधिकृत साईटवर cbn.gov.in जावे लागेल

या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांची यादी असेल. त्यात ऑनलाईन अर्ज करता येईल.

या अर्जात जमीन आणि शेतकऱ्यांची सर्व माहिती देणे आवश्यक आहे.

यानंतर संबंधित खाते शेतकऱ्याची कागदपत्रे तपासून पुढील कारवाई करते

सर्व सेवा शर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना अफू शेती करण्याचा परवाना मिळतो.

पात्र शेतकऱ्यांना कमाल 0.10 हेक्टर जमिनीवरच अफूची शेती करण्याचा परवाना देण्यात येतो.

Follow Us
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष