AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात लॉन्च होतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त 7.5 लाख रुपये, लुक पाहूनच…

टाटा पंचला टक्कर देण्यासाठी भारतात येतेय सर्वात आकर्षक आणि स्वस्त SUV कार. जिचा लुक पाहूनच ग्राहक पडत आहेत प्रेमात. किंमत फक्त 7.5 लाख रुपये.

भारतात लॉन्च होतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त 7.5 लाख रुपये, लुक पाहूनच...
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 28, 2026 | 12:49 PM
Share

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत असताना आता VinFast कंपनीची छोटी इलेक्ट्रिक SUV VinFast VF3 चर्चेत आहे. ही कार आकाराने छोटी, आकर्षक SUV लूक असलेली आणि शहरातील गर्दीच्या रस्त्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. या कारची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 7.5 लाख ते 10 लाख रुपये असू शकते. कंपनी ही कार 2027 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे.

VinFast VF3 ची लांबी फक्त 3,190 मिमी असून व्हीलबेस 2,075 मिमी आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यांवरून गाडी चालवणे आणि पार्किंग करणे सोपे होऊ शकते. या कारला बॉक्सी डिझाइन, ब्लॅक क्लॅडिंग आणि 191 मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. ही दोन दरवाजांची चार आसनी इलेक्ट्रिक कार असून, केबिनमध्ये 10-इंच टचस्क्रीन दिली आहे.

बॅटरी, पॉवर आणि रेंज

ग्लोबल मॉडेलनुसार, VinFast VF3 मध्ये 18.64 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो. यामध्ये मागील बाजूस इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून ती 43.5 bhp पॉवर आणि 110 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एका चार्जमध्ये 210 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. मात्र, भारतीय मॉडेलची बॅटरी, फीचर्स आणि प्रत्यक्ष रेंज याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

किंमत किती असणार?

VinFast VF3 ची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 7.5 लाख ते 10 लाख रुपये असू शकते. भारतीय बाजारात या कारची स्पर्धा MG Comet EV आणि Tata Punch EV यांसारख्या इलेक्ट्रिक कारशी होऊ शकते. कमी किंमत आणि कॉम्पॅक्ट आकारामुळे VF3 शहरी ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते.

कंपनीने Battery-as-a-Service (BaaS) योजना आणल्यास सुरुवातीला कार खरेदी करण्याचा खर्च आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, ही योजना भारतात उपलब्ध होणार की नाही, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

VinFast VF3 च्या भारतातील लॉन्चची तारीख, अंतिम किंमत आणि भारतीय मॉडेलचे फीचर्स अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे 2027 मधील लॉन्च आणि किंमतीचे आकडे हे सध्या संभाव्य अंदाज आहेत. अनेकजण या कारचा लुक पाहून देखील ती कधी लॉन्च होतेय याची वाट बघत आहेत.

Follow Us
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष