काँग्रेसचा सुपडा साफ; विधान परिषदेच्या 4 जागांवर NDA चा जलवा, कर्नाटकात डाव कसा फिरला?
कर्नाटकातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. विधान परिषदेच्या 4 जागांवर NDA ने विजय मिळवला आहे.

कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एनडीएने चांगली कामगिरी केली. एनडीएने निवडणुकीत 4 जागांवर विजय प्राप्त केला. भाजपने 3 जागांवर विजय मिळवलाय. तर मित्रपक्ष जनता दल सेक्युलरने एक जागा जिंकली. कर्नाटकात काँग्रेस सत्ताधारी असताना एकही जागा जिंकू शकले नाहीत. कर्नाटाकातील या निकालाची जोरदार चर्चा होत आहे.
शिक्षक आणि पदवीधर विधानसभा परिषदेत निवडणुकीत भाजप आणि ‘जेडीएस’ला तगडं आव्हान होतं. या निवडणुकीत भाजपने ईशान्य शिक्षक, दक्षिण-पूर्व पदवीधर, पश्चिम पदवीधर मतदारसंघात कर्नाटकातील विरोधकांनी बाजी मारली आहे. जेडीएसने एक जागा जिंकत त्यांची ताकद सिद्ध केली आहे. बेंगळुरूतील शिक्षक मतदारसंघात जेडीएस उमेदवार एपी रंगनाथ यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 908 मतांनी पराभव केला. रंगनाथ यांना 10810 मते मिळाली. तर काँग्रेसचे विद्यमान आमदार पुट्टन्ना यांना 9902 मते मिळाली.
उत्तर पूर्व शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार शशिल जी. नमोशी यांनी काँग्रेस उमेदवार शरणप्पा मत्तूर यांचा पराभव केला. या मतदारसंघातून त्यांनी पाचव्यांदा विजय मिळवला. या मतदारसंघात कलबुर्गी आणि कल्याण कर्नाटकचा जिल्ह्याचा समावेश आहे. कलबुर्गी हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर दक्षिण पूर्व पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार केएम सुरेश यांनी काँग्रेस उमेदवार शशी हलिकुंटे मठ यांचा पराभव केला.
‘पश्चिम पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार एसवी संकनूर यांनी विजय मिळवला. एनडीएने विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. भाजप नेत्याने म्हटलं की, एनडीएने मोठं यश मिळवलं आहे. काँग्रेसने पसरवलेले नॅरेटिव्ह उघडे पडले आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरली आहे. जनता काँग्रेसला सरकारला त्रस्त झाली आहे. आगामी निवडणुकीत काय होणार, याचे संकेत विधानपरिषदेच्या निवडणुकीतून मिळाले आहेत. काँग्रेसने या निकालातून धडा घेतला पाहिजे. आता जनता तुमच्यासोबत नाही. खरंतर ते वास्तवापासून दूर आहेत, असेही त्यांनी सांगितले.
