AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर चीनने निर्णय घेतला! युद्ध सुरू असतानाच काढला धडकी भरवणारा आदेश; डोनाल्ड ट्रम्प काय करणार?

इराण-इस्रायल युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. या युद्धात अमेरिकादेखील उतरली आहे. असे असतानाच आता चीनने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे.

अखेर चीनने निर्णय घेतला! युद्ध सुरू असतानाच काढला धडकी भरवणारा आदेश; डोनाल्ड ट्रम्प काय करणार?
xi jinping and donald trumpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 05, 2026 | 3:41 PM
Share

Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जग हादरले आहे. अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश मिळून इराणवर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमुळे आतापर्यंत इराणमध्ये 700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनेई यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर युद्धाचा भडका जास्तच भडकला असून आखाती देशही युद्धात भरडले जात आहेत. चीनसारख्या देशाने या युद्धाबद्दल नाराजी व्यक्त करत इराणची बाजू घेणारी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, हे युद्ध भडकलेले असतानाच आता चीनने सर्वांनाच चकित करणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चीनच्या मनात नेमकं काय आहे? असा सवाल उपस्थित केला जातोय.

चीनने नेमका काय निर्णय घेतला?

जगात सध्या युद्धामुळे मोठा तणाव आहे. असे असताना आता चीनने आपल्या सैन्याला बळकटी देण्याचे ठरवले आहे. चीनने गुरुवारी आपल्या संरक्षण बजेटमध्ये 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीसह आता चीनच्या संरक्षण बजेटचा आकडा 275 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला आहे. याआधीच्या संरक्षण निधीच्या तुलनेत नवा निधी हा 25 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. आपल्या लष्करात आधुनिकीकरण घडवून आणणे तसेच अमेरिकन सैन्याची बरोबर करणे असा यामागचा उद्देश आहे. चीन आपल्या संरक्षण निधीमध्ये सातत्याने वाढ करत असल्याने आता या देशाच्या शेजारी राष्ट्रांनाही संरक्षण क्षेत्रात आपली शक्ती आणखी वाढवणे गरजेचे होऊन बसले आहे. अमेरिकेनंतर चीनचे संरक्षण क्षेत्रातील बजेट हे सर्वाधिक मोठे आहे. 2024 साली चीनने आपल्या संरक्षण बजेटमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ करून 232 अब्ज डॉलर्सपर्यंत तरतूद केली होती.

दरम्यान, सध्या चालू असलेल्या इराण आणि इस्रायलच्या युद्धात चीनने अद्याप उडी घेतलेली नाही. परंतु चीनने अमेरिकेच्या भूमिकेला विरोध केलेला आहे. त्यामुळे युद्धाचा भडका उडालाच तर भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.
VSR कंपनीच्या मालकाची CID चौकशी सुरू; जय पवारांच्या ट्विटनंतर कारवाई
VSR कंपनीच्या मालकाची CID चौकशी सुरू; जय पवारांच्या ट्विटनंतर कारवाई.
पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात; नागरिकांमध्ये संताप
पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात; नागरिकांमध्ये संताप.
संजय राऊत आणि रामदास आठवलेंची गळाभेट; राजकीय चर्चांना उधाण
संजय राऊत आणि रामदास आठवलेंची गळाभेट; राजकीय चर्चांना उधाण.
राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब
राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब.