AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Semi Final: भारताला अंतिम फेरी गाठायची तर इंग्लंडच्या या पाच खेळाडू रोखणं आवश्यक, कोण ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदापासून भारतीय संघ दोन विजय दूर आहे. भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. या सामन्यात भारतासमोर इंग्लंडच्या पाच खेळाडूंचं आव्हान असणार आहे. कोण आहेत हे खेळाडू ते जाणून घ्या.

Semi Final: भारताला अंतिम फेरी गाठायची तर इंग्लंडच्या या पाच खेळाडू रोखणं आवश्यक, कोण ते जाणून घ्या
भारताला अंतिम फेरी गाठायची तर इंग्लंडच्या या पाच खेळाडू रोखणं आवश्यक, कोण ते जाणून घ्याImage Credit source: Michael Steele/Getty Images
| Updated on: Mar 04, 2026 | 6:28 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे. भारताला अंतिम फेरी गाठायची असेल तर हे कठीण आव्हान काहीही करून पेलावं लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाचा, खेळपट्टीचा आणि हवामानाचा चांगला अंदाज इंग्लंडच्या खेळाडूंना आहे. त्यामुळे हे आव्हान काही सोपं नाही. भारताला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर इंग्लंडच्या पाच खेळाडूंना रोखणं गरजेचं आहे. कारण इंग्लंडचे पाच खेळाडू सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. अशा स्थितीत भारतीय फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना सावध राहावं लागणार आहे. एका ठिकाणी कमकुवत पडलो तर त्याचा फायदा पाच पैकी एखाद दुसरा खेळाडू आरामात घेऊ शकतो. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत…

हॅरी ब्रूक : इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक सध्या फॉर्मात आहे. त्याने आपल्या फलंदाजीची झलक पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दाखवली. एका बाजूने संघ ढासळला असताना एकहाती सामना खेचून आणला. हॅरी ब्रूकने 51 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारत 100 धावा केल्या होत्या. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात त्याने 228 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 161.70 चा आहे. त्यामुळे हॅरी ब्रूकला झटपट बाद करण्याचं आव्हान असणार आहे.

फिल सॉल्ट : या स्पर्धेत फिल सॉल्टची कामगिरी सातत्यपू्र्ण नाही. पण त्याची बॅट कधीही तळपू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने आक्रमक फटकेबाजी केली होती, हे विसरून चालणार नाही. त्यात सॉल्टला वानखेडेच्या खेळपट्टीचा अंदाज आहे. या खेळपट्टीवर आयपीएल स्पर्धेत त्याने चांगला घाम गाळला आहे. जर पहिल्या तीन षटकात सॉल्ट टिकला तर त्याला बाद करणं किंवा त्याच्याकडून येणाऱ्या धावा रोखणं कठीण होईल.

विल जॅक्स : मधल्या फळीत विल जॅक्स सामन्याचं चित्र पालटू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने हे दाखवून दिलं आहे. त्याने 18 चेंडूत 50 धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला होता. त्यामुळे इंग्लंडच्या झटपट विकेट पडल्या तरी सामना सहज जिंकू देणार नाही. इतकंच काय तर गोलंदाजीतही कमाल करू शकतो. मधल्या फळीत असलेल्या डावखुऱ्या तिलक वर्मा, शिवम दुबे आणि अक्षर पटेलसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

जोफ्रा आर्चर : वानखेडेची खेळपट्टीवर हिरवळ असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत करेल असं बोललं जात आहे. त्यामुळे जोफ्रा आर्चर भारतीय फलंदाजांसाठी त्रासदायक ठरू शकतो. पावरप्लेच्या षटकात वेगवान धावांना ब्रेक लावू शकतो. त्याचा सामना करताना अभिषेक शर्मा आणि इशान किशनला अडचणीचं होऊ शकतं. जोफ्रा आर्चरने या स्पर्धेत आतापर्यंत 10 विकेट घेतल्या आहेत.

आदिल रशीद : भारतीय फलंदाजांची फिरकीविरूद्ध कमकुवत बाजू मागच्या काही वर्षात दिसून आली आहे. 2022 आणि 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रशीदने भारतासमोर अडचण निर्माण केली आहे. या पर्वातही त्याची गोलंदाजी चांगली चालली आहे. त्याने आतापर्यंत 11 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे त्याचा सामना करताना मधल्या फळीतील फलंदाजांना अडचणीचं जाऊ शकतं.

Follow Us
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....