AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉमेडी करा ना, नाही माहित तर बोलू ही नका.. पेपरफुटीवरून भूमिका मांडताच हास्यजत्रातली अभिनेत्री झाली ट्रोल

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन तीव्र झाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना, मराठी सेलिब्रिटीही यावर मत व्यक्त करत आहेत. अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने 'जबाबदारी आणि पारदर्शकता' यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे, तर काही चाहते तिचा पाठिंबा देत आहेत.

कॉमेडी करा ना, नाही माहित तर बोलू ही नका.. पेपरफुटीवरून भूमिका मांडताच हास्यजत्रातली अभिनेत्री झाली ट्रोल
हास्यजत्रातली अभिनेत्री झाली ट्रोल
| Updated on: Jul 23, 2026 | 1:19 PM
Share

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनचा तीव्रता कमालीची वाढली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचया राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवंस वाढत चाललं असून आता अअनेक नेते, राजकारणी, तसेच सेलिब्रिटींनीही या मुद्यावर ठाम भूमिका मांडायला सुरूवात केली आहे. आंदोलक, विरोध यासोबतच सोशल मीडियावरून याबद्दल आवाज उठवण्यात येत असून अनेक अभिनेते- अभिनेत्रीही याविषायवर मोकळेपणाने बोलत आहे, आपापली मतं मांडत आहेत. नीट पेपर गैरव्यहवहार, आंदोलन, लाठीचार्ज या विषयावरच सध्या जरोदरा चर्चा सुरू असून मराठी मनोरंजन सृष्टीमधील अनेक सेलिब्रिटींनीही यावर मत व्यक्त केलं आहे. मात्र कित्येकांना त्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Accountability- जबाबदारी आणि पारदर्शकता ???????? .. कुठे आहे ??? 🙏🙏 – असा प्रश्न विचारत, हास्यजत्रा फेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर हिने एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये तिने काही प्र्शनही विचारलेत, मात्र सोशल मीडियावर तिचं असं व्यक्त होणं अनेकांना आवडलं नसून, अनेक नेटीझन्सनी तिच्यावर टीका केलीआहे, तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. Social मीडिया बघून मत मांडू नका. नीट अभ्यास करा आणि बोला. अर्धवट ज्ञान.. असं लिहीत अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

काय आहे रसिकाची पोस्ट ?

हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकरचे अनेक चाहते आहेत. या शोमुळे तिचं नाव घराघरांत पोहोचलं. पिविध कमेंट्ण टीव्हीवर लोकांना हसवण्याचं काम करणाऱ्या रसिकाने एखाद्या विषयावर सीरिअसपणे तिचं मत मांडणं लोकांना फार रुचलेलं नाहीये. रसिकाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ‘नीटचे पेपर लीक झाले.. वर्ष वर्ष अभ्यास करून, मेहनत घेऊन ज्या मुलांनी परीक्षा दिल्या ते निराश झाले.. त्यांनी केल्या आत्महत्या.. नागरिक सगळे हवालदिल झाले.. या सगळ्याला जबाबदार कोण ?’ असं लिहीलेला एक फोटो टाकत तिने जबाबदारी आणि पारदर्शकता कुठे आहे ??? अशी कॅप्शन देऊन प्रश्न विचारला.

नेटीझन्सकडून झाली ट्रोल

मात्र तिच्या या पोस्टवर कमेंट्स आल्या असून अनेकांनी तिला ट्रोल केलंय, तिच्यावर टीका केली आहे. ‘ आलीस का बाई तू पण? असंही हास्यजत्रेवाले जवळजवळ सगळेच डावे आहेत म्हणा! एक नटी म्हणून मला फ्रेशर्स मालिकेपासूनच आवडत होतीस तू पण माणूस म्हणून इतकी उथळ असशील असं वाटलं नव्हतं’ अशा शब्दांत एका युजरने तिला सुनावलं आहे. तर, ‘अर्धवट ज्ञान घातक रे बाबा! कॉमेडी करा ना ताई, कशाला उगाच नको तिकडे घुसतेस’ अशा शब्दांत दुसऱ्या युजरने तिच्यावर टीकास्त्र सोडलं. Madam कॉमेडी करा ना…… नाही माहित तर बोलू ही नका ना, अशी टीकाही काहींनी केली आहे. मात्र रसिकाच्या काही चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शवला असून असा स्टंड घेतल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे. लाकार…आधी तुझा अभिनय आवडायचा आता तुझा अभिमान वाचतो, असं म्हणते एक युजरने तिची स्तुति केली आहे.

Follow Us
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...