Amravati Teachers constituency Election Result : तीन बंडखोर, भावाचंही आव्हान; पण एकनाथ भाईंचा करिष्मा चालला, अमरावती शिक्षकमध्ये सरनाईकांचा मोठा विजय!
राज्यातील MLC निवडणुकांचे फायनल निकाल आता समोर येत आहेत. कालपासून सुरु असलेली मतमोजणी आता अंतिम टप्प्यात असून अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. याठिकाणी किरण सरनाईक यांचा मोठा विजय झाला आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांचा विजय झाला आहे. विजयानंतर किरण सरनाईक यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील सदस्य अमरावतीच्या लोकशाही भवन मध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. शिक्षकांचे प्रश्न त्यांनी सोडवले म्हणून ते विजयी झाले विजयाबद्दल आनंद वाटतो, अशी पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय राजकारण म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप होत असतात, असंही त्यांनी सागितलं. त्याचवेळी विजयी उमेदवार किरण सरनाईक यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकी किती मिळाली मतं?
अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. याठिकाणी शिवसेनेचे किरण सरनाईक हे विजयी झाले आहेत. भाजपच्या तीन बंडखोरांसह ज्यामध्ये त्यांच्या भावाचाही समावेश होता. याशिवाय महाविकास आघाडीच्या अदिती पोहरे यांचा याठिकाणी त्यांनी पराभव केला आहेत. किरण सरनाईक यांनी 13, 661 मतं मिळाली. महाविकास आघाडीतील गटबाजीमुळे अदिती पोहरे यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, पहिल्या पसंतीची एक हजार मतं कमी पडली अन्यथा आपण पहिल्याच फेरीमध्ये विजयी झालो अशी प्रतिक्रिया किरण सरनाईकांनी विजयानंतर दिली आहे. त्यांनी पुढे सांगितलं, स्थानिक निधीमधून मी सर्व शाळांना शैक्षणिक साहित्य दिलं. मला याकाळात असे काही शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य भेटले त्यांनी सांगितलं की, आमच्या सेवा निवृ्त्तीची वेळ आली पण आमच्याशाळेमध्ये कोणत्याही आमदाराने शैक्षणिक साहित्य दिलं नाही. शिक्षकांच्या हक्कासाठी हितासाठी आम्ही सातत्याने काम केलं. त्याचं फळ आज आम्हाला मिळालं असल्याचं मतही यावेळी किरण सरनाईकांनी मांडलं.
56 तालुक्यांचा मतदारसंघ आहे. कुठे ना कुठे बंडखोरीचा फटका बसू शकतो. त्यामुळे उशीर लागला नाहीतर दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्येच मी विजयी झालो असतो, असंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करिष्माही याठिकाणी चालला असं त्यांनी म्हटलं आहे. दोन सभा घेतल्या त्याचा फायदा झाला.
एकूण निकालाचं चित्र
अदिती पोहरे यांना 7,566 मतं अपक्ष उमेदवार कश्रीकांत देशपांडे यांना 7,717 मतं तर विजयी शिवसेना उमेदवार किरण सरनाईक 13,661 मतं
