AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...

‘मी अजूनही जिवंत आहे’; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण…

| Updated on: Jul 23, 2026 | 11:11 AM
Share

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 25 दिवसांच्या उपोषणानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश शेअर करत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी "मी अजूनही जिवंत आहे" असे सांगत आपल्या प्रकृतीबाबतही माहिती दिली. तसेच सरकारकडून काही आश्वासन मिळाल्यास आजच उपोषण सोडण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते नीट पेपरफुटी प्रकरणी उपोषणावर आहेत.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 25 दिवसांच्या उपोषणानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश शेअर करत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी “मी अजूनही जिवंत आहे” असे सांगत आपल्या प्रकृतीबाबतही माहिती दिली. तसेच सरकारकडून काही आश्वासन मिळाल्यास आजच उपोषण सोडण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते नीट पेपरफुटी प्रकरणी उपोषणावर आहेत.

सोनम वांगचुक यांनी सांगितले की, 25 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांचे सुमारे 11 किलो वजन कमी झाले असून शरीरातील स्नायूही कमी होऊ लागले आहेत. तरीही आपली प्रकृती सध्या स्थिर असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी सांगितले की, त्यांना सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उपचार सुरू असतानाही त्यांनी आपल्या आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत संयम दाखवला. त्यांच्यावर कारवाई झाली तरी त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही. विद्यार्थ्यांच्या या भूमिकेमुळे आपण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वांगचुक म्हणाले.

दरम्यान, काही मंत्री आणि इतर नेत्यांनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. सरकारने विद्यार्थ्यांवर FIR दाखल होणार नाही, असे आश्वासन द्यावे आणि आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर टाळावा, अशी मागणी त्यांनी केली. हे आश्वासन मिळाल्यास आजच उपोषण समाप्त करण्यास तयार असल्याचे सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केले.

Published on: Jul 23, 2026 11:11 AM

Follow Us