Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले…
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर लोकभावनांचा आदर राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त कोणतेही बॅनर, पोस्टर्स किंवा स्वागत फलक लावू नयेत, असे आवाहन केले आहे.
तसेच, वाढदिवसानिमित्त कोणताही जल्लोष किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सूचित केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत असून, आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सरकारने संवाद साधावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 23, 2026 11:55 AM
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

