AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Semi Final: उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सुनील गावस्कर यांचा टीम इंडियाला इशारा, या खेळाडूपासून राहा सावध!

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड भिडणार आहे. दोन्ही संघात जमेच्या बाजू आणि उणीवा आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला सावध केलं आहे. इंग्लंडच्या या खेळाडूविरुद्ध खेळताना सावधगिरी बाळगा असा इशारा दिला आहे.

Semi Final: उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सुनील गावस्कर यांचा टीम इंडियाला इशारा, या खेळाडूपासून राहा सावध!
उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सुनील गावस्कर यांचा टीम इंडियाला इशारा, या खेळाडूपासून राहा सावध!Image Credit source: PTI
| Updated on: Mar 04, 2026 | 7:29 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. हा सामना 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तसं पाहिलं तर टीम इंडियाचं होमग्राउंड असल्याने भारताचं पारडं जड आहे. तसेच या मैदानावर बरंच क्रिकेट खेळलेले खेळाडू भारतीय संघात आहेत. त्यामुळे भारताचं वजन अधिक आहे. मात्र असं असलं तरी इंग्लंडला कमी लेखूण चालणार नाही. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे. इंग्लंडच्या एका खेळाडूपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अष्टपैलू विल जॅक्स आहे… विल जॅक्स सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 4 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म काय आहे हे दिसून येते.

विल जॅक्सने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सात सामन्यात 191 धावा केल्या आहेत. तसेच सात विकेटही काढल्या आहे. मोक्याच्या क्षणी इंग्लंडला संकटातून काढण्यात त्याचा हातभार राहिला आहे. त्याच्या खेळीचा अंदाज घेऊन माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले की, ‘जर खेळपट्टी थोडी वळली तर विल जॅक्सचा सामना करणे भारतीय फलंदाजांसाठी एक आव्हान असेल. विशेषतः संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यासारखे उजव्या हाताचे फलंदाज त्याच्याविरुद्ध कसे खेळतात हे सामन्याचा निकाल ठरवेल.’ इतकंच काय तर विल जॅक्सचा सामना करताना डावखुऱ्या फलंदाजांनी सावध राहावं. डावखुरे फलंदाज अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी काळजीपूर्वक फलंदाजी करावी.

विल जॅक्स हा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीला खोली मिळते. त्याची आक्रमक फलंदाजी इंग्लंडसाठी फायद्याची ठरते. उपांत्य फेरीचा सामना हा रोमांचक होईल असं भाकीत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. सुनील गावस्कर यांनी स्पष्ट केलं की, दोन्ही संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि अनुभवात समान आहेत आणि जो कोणी दबावावर मात करेल तो अंतिम फेरीत पोहोचेल.

Follow Us
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....