AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tipu Sultan BJP: ते तर माझं कर्तव्य… टिपू सुलतान जयंतीला उपस्थित राहिलो, यात गैर काय? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेता म्हणाला काय?

BJP Corporator Vilas Londhe on Tipu Sultan: टिपू सुलतान जयंतीवरून हिंदू संघटनांसह भाजपने विरोधी सूर आळवला असताना भाजप नेताच जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने एकच चर्चा झाली. व्हायरल व्हिडिओ आणि वादानंतर या नेत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Tipu Sultan BJP: ते तर माझं कर्तव्य... टिपू सुलतान जयंतीला उपस्थित राहिलो, यात गैर काय? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेता म्हणाला काय?
टिपू सुलतान जयंतीला उपस्थित राहिलो, यात गैर काय? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेता म्हणाला काय?
| Updated on: Nov 22, 2026 | 6:33 AM
Share

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: राज्यात टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली. त्यावर हिंदू संघटनांसह भाजपने विरोधी सूर आळवला. काही नेत्यांनी तर अशा जयंती साजरी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी धाराशिवमधील भाजप नगरसेवक विलास लोंढे हेच जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे समोर आले. याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता लोंढे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी या वादावर थेट सवाल करत पक्षाला झोंबणारी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचीच आता चर्चा सुरू आहे.

टिपू सुलतान जयंतीला उपस्थित राहिलो, यात गैर काय?

टिपू सुलतान यांच्या जयंतीला उपस्थित राहिलेले भाजपचे नगरसेवक विलास लोंढे यांनी व्हिडिओ समोर आल्यानंतर थेट प्रतिक्रिया नोंदवली. टिपू सुलतान जयंतीला उपस्थित राहिलो, यात गैर काय? असा रोकडा सवाल त्यांनी केला. टिपू सुलतान चौक हा माझ्या प्रभागात येत असल्याने जयंतीला उपस्थित राहणे हे माझे कर्तव्य होते, असे सांगायला लोंढे विसरले नाही. त्यांनी त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली. त्यांनी याविषयीच्या वादावर स्वतः समोर येत भूमिका मांडली.

मी भाजपचा कार्यकर्ता असून पक्षाच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या कार्यप्रणालीनुसार काम करतो. त्यामुळे सर्वधर्मसमभाव मानून जयंतीत सहभागी झालो. टिपू सुलतान जयंतीमध्ये सहभागी झालो आणि त्यासंदर्भातील रिल्सही सोशल मीडियावर व्हायरल केल्या, विलास लोंढे यांनी कबुली दिली.

तर मग वादाचा विषय

टिपू सुलतान यांच्या जयंतीला उपस्थित राहण्याबाबत कोणताही वाद नाही; मात्र टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे खरा वाद निर्माण झाला. भाजप हा सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. त्यामुळे माझ्या सहभागावरून जातीय मतभेद निर्माण करणे चुकीचे. भारतीय संविधानातील छायाचित्रांचा संदर्भ देत टिपू सुलतान यांचा फोटो झाशीच्या राणीच्या बाजूला आहे यावरून मतभेद करू नये. धाराशिव शहरात टिपू सुलतान यांच्या जयंती मध्ये सहभाग नोंदवल्यामुळे भाजपाचे नगरसेवक विलास लोंढे चर्चेत आले आहे.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...