Navnath Ban Press | मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी, राऊत आणि भाजपमध्ये जुंपली; कुणी काय केली टीका?
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात आज मुंबईतून झाली असून त्यांच्या स्वागतासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून शहरात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना टीका केली, “मॅक्रॉन यांना स्वीकृत नगरसेवक करायचं आहे का? हा सगळा वेड्यांचा बाजार आहे. या लोकांची वेड्यांची जत्रा भरली आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात आज मुंबईतून झाली असून त्यांच्या स्वागतासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून शहरात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना टीका केली, “मॅक्रॉन यांना स्वीकृत नगरसेवक करायचं आहे का? हा सगळा वेड्यांचा बाजार आहे. या लोकांची वेड्यांची जत्रा भरली आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली. “परदेशी राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान किंवा नेते भारतात येतात आणि जातात, यात राजकीय पक्षांचा थेट संबंध काय?” असा सवाल उपस्थित केला.
यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना बन म्हणाले, “खासदार संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद खुळ्यांची पत्रकार परिषद म्हणावी लागेल. जेव्हा ते इतरांना ‘वेड्यांचा बाजार’ म्हणतात, तेव्हा स्वतः खुळे आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारतात येतात, तर त्यांचं स्वागत करावंच लागेल. अतिथी देवो भव: ही भारताची प्राचीन परंपरा आहे. तुम्ही जनाब झालात, त्यामुळे इतर आलेल्या पाहुण्याचं स्वागत करण्याचं सौजन्य संजय राऊत यांच्यामध्ये नाही,” असा टोला बन यांनी लगावला. मुंबईत शहरातील पोस्टरबाजी आणि राजकीय टीका यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Published on: Feb 17, 2026 03:46 PM
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का

