AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरुंगात बनला रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा प्लॅन; कोण आहे मास्टरमाईंड?

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू इथल्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे. त्यांच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. गोळीबाराचा प्लॅन तुरुंगातूनच केल्याचं उघड झालं आहे.

तुरुंगात बनला रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा प्लॅन; कोण आहे मास्टरमाईंड?
Rohit ShettyImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 17, 2026 | 10:38 AM
Share

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर गोळीबाराच्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण मिळालं आहे. गोळीबाराचा हा कट तुरुंगातून रचला गेल्याचा पोलिसांना संशय आहे. फरार आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरने तुरुंगातून हा सगळा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. प्रवीण लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून पोलिसांच्या मते त्याने तुरुंगात राहूनच शस्त्रे आणि पैशांची व्यवस्था केली अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मुख्य शूटरसह आतापर्यंत 12 आरोपींना पुणे, हरियाणा आणि उत्तर प्रदेश इथून अटक करण्यात आली आहे.

प्रवीण लोणकर आधीपासून जेलमध्ये असल्याने त्याला या प्रकरणात औपचारिक अटक करून रिमांडवर घेण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार घटनेत वापरलेली मोटारसायकल, पिस्तूल आणि फंडिंगची व्यवस्था प्रवीण लोणकरच्या इशाऱ्यावर करण्यात आली होती. तुरुंगात राहून त्याने हे ऑपरेशन कसं चालवलं यावर तपास सुरू आहे. या हाय-प्रोफाइल गोळीबाराच्या घटनेत मुंबई पोलिसांनी मकोका (MCOCA) लावला आहे.

प्रवीण लोणकरने तुरुंगात हा संपूर्ण मास्टरप्लॅन केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. त्यामुळे प्रवीणने तुरुंगात असताना हे सर्व कसं केलं, तो कोणाच्या संपर्कात होता, संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी त्याने कोणत्या माध्यमांचा वापर केला, तुरुंगात त्याला कोण मदत करत होतं, हे मोठे प्रश्न आहे गुन्हे शाखेसमोर आहेत. गुन्हे शाखेच्या 12 पथकांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी रोजी आरोपी सिद्धार्थ येनपुरे आणि समर्थ यांनी पुण्याहून मुंबईला एक दुचाकी आणली आणि ती मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर पार्क केली. हीच दुचाकी गोळीबार करणाऱ्याने वापरल्याचा आरोप आहे. गोळीबार करणारा आरोपी हा मूळचा बिहारचा रहिवासी असून चार ते पाच साथीदारांसह तो मुंबईत राहिला होता. घटनेपूर्वी त्याने रोहित शेट्टीच्या घराची तीन ते चार वेळा पाहणी केली होती, असंही म्हटलं जात आहे.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?